शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

गुरुसेवेचेही रेटकार्ड!

By admin | Updated: September 5, 2015 23:38 IST

सेवेचे मोजा मोल : चतुर्मासात आर्थिक सहवास

संजय पाठक , नाशिकगुरुंच्या कृपेसाठी काय हवे... दोन हात अन् तिसरे मस्तक, अशा जुनाट कल्पनांमधून आता बाहेर पडण्याचे दिवस आहेत. ज्या श्रद्धापूर्ण अंत:करणातून ईश्वराच्या सेवेकडे जाण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंची सेवा करावी आणि गुरु सेवा हीच ईश्वर सेवा समजावी, त्या गुरुंची सेवा आता आर्थिक निकषावर होऊ लागली आहे. ही कल्पनाही नवीन नसली तरी नाशिकमध्ये यंदा कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकापाठोपाठ गुरुंचे आगमन होत आहे, त्यातील बहुतांशी गुरुंनी छापलेल्या रेटकार्डमुळे आता गुरुसेवा सशुल्कच होऊ शकते, असाच एक संदेश पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निमित्त आहे ते कुंभमेळा आणि चतुर्मासाचे ! नाशिकमध्ये एकापाठोपाठ अनेक धार्मिक गुरु दाखल झाले असून, आणखी काही लवकरच दाखल होत आहेत. त्यानिमित्ताने प्रवचन आणि सत्संगाचा अनोखा योग साधला जाणार असला तरी अनेक धार्मिक गुरुंनी सशुल्क सेवेची अट घातल्याने गुरुंची ‘आर्थिक’ पर्वणी, परंतु भाविकांना मात्र भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही मोहमायापासून दूर असणाऱ्या धर्मगुरुंच्या या द्रव्यासक्तीमुळे भाविकांना मात्र द्रव्याशिवाय भक्ती नाही या कलियुगातील नव्या मंत्राला सामोरे जावे लागणार आहे.बारा वर्षांनंतर भरणारा सिंहस्थ कुंभमेळा यंदा नाशिकमध्ये भरला आहे. गेल्या १४ जुलैला सिंहस्थ पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर खास कुंभमेळ्यासाठी साकारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये आखाडे आणि खालशांना जागावाटप झाल्यानंतर त्याचे साधू-महंतांचे आगमन होऊ लागले आहे. दुसरीकडे कुंभमेळ्यातील आखाड्यांशी थेट संबंध नसलेल्या; परंतु विविध संस्थाने आणि मठ असणाऱ्या धार्मिक गुरूंनी नाशिकमध्ये डेरा जमवला आहे. आपल्या खास शिष्यांकरवी नाशिकमध्ये तात्कालिक सेवा समित्या स्थापन करून या धर्मगुरुंनी डेरा जमविला आहे. साधू-महंतांबरोबरच अशा प्रकारच्या अध्यात्मिक गुरुंच्या आगमनाप्रीत्यर्थ मिरवणुका, शोभायात्रा या माध्यमातून त्यांचे श्रद्धावैभव दिसून येत आहे; शिवाय कुंभमेळ्याच्या रामरगड्यात जाऊन सर्वांपैकी एक न होता गंगास्नान करून हे गुरुआत्ताच पावन होत आहेत. या गुरुंचे शहरात विविध ठिकाणी प्रवचन आणि सत्संगाचे कार्यक्रमही होत असून, त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र अनेक गुरुंनी भाविकांसाठी सशुल्क सेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. साध्या गुरुदर्शनाने पुनीत होतानाही भाविकांचा हात श्रद्धेने खिशाकडे जातोच; परंतु त्यापलीकडे जाऊन वंदनापासून पूजाअर्चा कार्यात सहभागी होण्यासाठी थेट रेटकार्डच जाहीर केले आहे. पादुकापूजा, फलसमर्पण, चतुर्मास सेवा, अन्नदान अशा सर्व प्रकारच्या सेवांसाठी एकशेएक रुपयांपासून दहा हजार एक रुपयांपर्यंतचे रेटकार्डच छापण्यात आले आहे. त्यामुळे गुरुसेवेचा लाभ झाला; परंतु त्याचबरोबर आर्थिक सेवाही बजवावी लागणार आहे. अर्थात, या सक्तीपलीकडे गुप्तदान देणारे किंवा देणारा आणि घेणारा यांनाच ज्ञात असलेली दक्षिणा, वर्गणी वा शुल्क हे अद्याप रेटकार्डवर नाही, त्याचा विचार केल्यास चतुर्मासात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे भाकित अलीकडेच एका आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने केले आहे. त्यातून सर्वसामान्यांना किती लाभ मिळेल हे माहिती नाही. मात्र, धार्मिक संस्थांची उलाढाल यात निश्चितच लक्षणीय असेल, असे स्पष्ट दिसत आहे.

तेल ओतायला पैसे, नारळाच्या आहुतीही सशुल्क कुंभमेळ्यात साधुग्रामजवळच आखाड्याशी संबंधित नसलेल्या एका  आध्यात्मिक गुरुने नाशिकमध्ये हिमालयाइतका मोठा मंडप साकारला आहे. येथे सुरू केलेल्या महायज्ञात एक कोटींवर नारळांची आहुती द्यायची आहे, त्यासाठी एका नारळाला ४0 रुपये, तर अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी तेल अर्पण करण्याचे दर चाळीस रुपयांपासून १२0 रुपये इतके ‘माफक’ आहेत.