शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:45 IST

विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : विविध सामूहिक सोहळ्यांना बंदी

ब्राह्मणगाव : विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.मंगल वाद्य वाजवणे, घरोघरी जाऊन बिल्वपत्र वाटणे, फुलहार विकणे, गाव, शहरातील शिव मंदिरांत पूजा व साफसफाई करणे अशी कामे गुरव समाजबांधव करतो. त्यामुळे मिळणाºया पैसांवर त्याचा उदरविर्नाह चालतो. परंतु कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे व विविध सोहळे व इतर सोहळ्यांना बंदी असल्याने चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न या वर्गाला पडला आहे. कोरोनामुळे उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आल्याने आम्ही भांबावले आहोत. भविष्याची कोणतीही आर्थिक तरतूद नाही. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असे मंगल वाद्य वाजवणारे शरद गुरव यांनी सांगितले.लग्नसराई म्हटली की मंगलवाद्याला मागणी असते. सनई-चौघडा असला की विवाह सोहळ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. मात्र मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने विवाह सोहळे थांबले आहेत. सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. व्यवसाय बंद पडल्यामुळे गुरव समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे बंद केल्याने मंदिराबाहेरील सर्वच लहान-मोठी दुकाने बंद झाली आहेत.फूलमाला, बिल्वपत्र वाटणेही बंद झाल्याने सर्वच आवक बंद झाली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शासन आदेशामुळे ठरावीक लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडली जात आहेत. मंगलवाद्य वाजविण्यासाठी परवानगी दिल्यास आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावनाही शरद गुरव यांनी व्यक्त केली.बेलपत्र वाटणे, मंदिराची साफसफाई, दिवाबत्ती आदी कामे आम्ही करतो. सध्य कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ही कामे बंद आहेत. दोन पैसे मिळण्यासाठी शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी.- शरद गुरव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय