शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

मालेगावी सव्वा लाखाचा गुटखा जप्त

By admin | Updated: October 20, 2015 22:12 IST

मालेगावी सव्वा लाखाचा गुटखा जप्त

आझादनगर : मालेगाव शहरातील किदवाई रस्त्याजवळ राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख ३० हजारांचा गुटका व सुगंधी तंबाखूचा माल जप्त केला आहे.याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी फिर्याद दिली. शाहीदखान प्यारेखान यास पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरात सुमारे २० लाखांचा गुटका जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.पोलीस अधीक्षक सुनींल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बी. डी. बागूल यांच्या पथकाने किदवाई रस्त्याजवळील कुंभारवाडा (तकीया) येथे दुपारी दोन वाजता एका राहत्या घरी छापा मारला. घराची झडती घेतली असता गुटका व सुगंधीत तंबाखू गोण्यात साठविलेले आढळून आली. तसेच घराच्या छताच्या पत्रावरही हा साठा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी छताच्या पत्र्यांवर चढून गुटका ताब्यात घेतला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहीद खान प्यारे खान (४५) रा. कुंभारवाडा घर नं. ३१० यास अटक करण्यात आली आहे. हवालदार एस. एस. जगदाळे, हर्षल खांडेकर, इमरान सैय्यद, गिरीष बागूल यांचा पथकात समावेश होता. (वार्ताहर)

एक महिन्यात चार ठिकाणी छापा

पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिन्यात चार ठिकाणी छापा टाकून १९ लाख ८४ हजार २३५ रुपयांचा गुटका व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमालही जप्त केला आहे.