शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रांवर बंदूकधारी पहारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:10 IST

नाशिक : महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षा रक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीस शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला.महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे मुंबईतील महाराष्टÑ स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन ...

ठळक मुद्देस्थायीची मंजुरी : आयुक्तांच्या कक्षाबाहेर राहणार एक शस्त्रधारी

नाशिक : महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षा रक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीस शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला.महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे मुंबईतील महाराष्टÑ स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांचेकडून एकूण ४५ सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी येणाºया १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला होता. या सुरक्षा रक्षकांमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षा रक्षक आहेत. यावेळी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी राजीव गांधी भवनमध्ये बंदूकधारी सुरक्षा रक्षक नियुक्तीस विरोध दर्शविला. महापालिका मुख्यालयात बंदूकधारी सुरक्षा रक्षक नेमण्याऐवजी पोलिसांची नेमणूक करावी अथवा महापालिकेच्याच सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही तिदमे यांनी केली. जगदीश पाटील यांनी सांगितले, राजीव गांधी भवनमध्ये एवढ्या बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची गरज नाही. त्याऐवजी सदर बंदूकधारी सुरक्षा रक्षक हे मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर तसेच संवेदनशील ठिकाणी नेमण्यात यावेत. पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेच्या कर्मचाºयांनाही प्रवेश करणे मुश्कील होते. जेथे आवश्यकता आहे तेथे बंदूकधारी सुरक्षा रक्षक प्राधान्याने नेमावेत, नंतर राजीव गांधी भवनचा विचार करावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी राजीव गांधी भवनमध्ये सर्वच बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता नसून, आयुक्तांच्या दालनाबाहेर एकाची नियुक्ती करावी आणि इतरांची जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरणावर नेमणूक करावी, असे आदेशित केले. दरम्यान, सूर्यकांत लवटे यांनी ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याची तक्रार केली तर जगदीश पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी इदगाह मैदान हे केवळ खेळासाठीच उपलब्ध करून देण्याची सूचना केली.