श्री छत्रपती शिवाजी विद्यालय
सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात टीडीके कंपनीचे मॅनेजर विवेक झंकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका पल्लवी पाटील, तसेच रामहरी संभेराव, अशोक पालक, सुलोचना गांगुर्डे, सोमनाथ पाटील, समाधान देवरे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, प्रा.डॉ.के.के.जाधव, संपतराव आहेर, रामनाथ शिंदे, दादाजी शिंदे,नरेंद्र वाणी,नारायण पवार, बन्सीलाल रायते,पंढरीनाथ शिंदे,बी,एल.चव्हान,प्रल्हाद रायते,मुख्याध्यापक एस.एम.पवार,सुदाम दाणे,उज्ज्वला जगदाळे आदी उपस्थित होते.
श्वास फाउंडेशन
श्वास फाउंडेशनच्यावतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर अध्यक्ष प्रा.डॉ.नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे,भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार,नगरसेविका प्रतिभा पवार, जगन पाटील,अविनाश पाटील,उद्योजक आनंदराव सूर्यवंशी,प्रमोद पाटील,संजय दंडगव्हाळ,किशोर सोनवणे, राजेंद्र पवार आदींसह श्वास फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्रशासन व राज्यशासनाच्या विविध योजनांची माहिती मकरंद वाघ यांनी दिली. प्रास्ताविक प्रदीप पेशकार यांनी केले.
आरंभ ग्रुप
सातपूर कॉलनीतील आरंभ ग्रुपच्यावतीने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक विजय कातोरे व नगरसेवक सलिम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका दीक्षा लोंढे, मुख्याध्यापिका सुनेत्रा तांबट, छाया गोसावी, संदीप भोजने, सोमनाथ पाटील,रामहरी संभेराव,हर्षल आहेर,चारूदत्त आहेर,वैभव महिरे,सुरेश खांडबहाले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आरंभ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लोकेश कटारिया यांनी केले. विनीत कोष्टी, आशिष पुजारी,केतन सुरवाडे,सागर भोये,अमन शेख, अहमद शेख,ऋषभ देबनाथ,संकेत गवळी,ओम सोनवणे,जतीन पगारे,तुषार नाईक,प्रथमेश बोठे,तुषार काळे, ज्ञानेश्वर पवार,सतीश वाघ आदी उपस्थित होते.
रत्नसिंधू मंडळ
रत्नसिंधू मित्रमंडळाच्यावतीने सूर्यकांत शिरोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष परशुराम कानकेकर होते. यावेळी माजी अध्यक्ष संजय साटलकर,लक्ष्मण तानीवडे,मंगेश पालव, सचिव नितीन सावंत,खजिनदार चंद्रकांत सावंत,राजेश पवार,सूर्यकांत सावंत,विद्याधर सावंत,सुभाष गावडे, प्रसाद वारंग,महेश चाळके,राजेश तानीवडे,मंगेश नलावडे, शिवा चव्हाण,महेंद्र जोइल,प्रवीण कुडतरकर,दीपक गावडे,दीपक सावंत,सदा परब,संदीप देसाई,शामल साटलकर आदी उपस्थित होते.
मातेाश्री गि.दे. पाटील विद्यालय, महिरावणी
शाळेत उपसरपंच रमेश खांडबहाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आरती हिरामण गोराळे, ग्रामसेवक जीवन सावकार,तलाठी आठवले,पोलीस पाटील दीपाली कैलास खांडबहाले, मुख्याध्यापक एम.पवार, सेंटल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था अध्यक्ष मधुकर खांडबहाले, ग्रामपंचायत सदस्य,शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी,ग्रामस्थ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपा शाळा क्रमांक २४
विश्वास नगर येथील मनपा शाळा क्रमांक २४ व बी. डी. भालेकर माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक सतीश भांबर यांनी केले. मुख्याध्यापक धर्मेंद्र देवरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रकाश शेवाळे यांनी केले. रमेश भोये यांनी आभार मानले. यावेळी मोहन चौधरी, शिवाजी शिंदे, नितीन पालवी,उज्ज्वला एखंडे,ज्योती गर्दे,अनिता शिराळे,स्वाती फटांगरे,प्रकाश गायकवाड,योगेश स्वामी, के.के.गायकवाड आदी उपस्थित होते.