शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्याचे गर्भपातासाठी गुजरात कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 19:24 IST

जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असले तरी, या तालुक्यांच्या तुलनेत सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारी ९०८ इतकाच आहे. त्यामानाने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये हाच जन्मदर अधिक असल्याचे आरोग्य खात्याच्या पाहणीतून लक्षात आल्यामुळे याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देआरोेग्य खात्याकडून शोध : माता-बालमृत्यूतही वाढआदिवासी समाजातही मुलगी नको असा मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आदिवासी असलेल्या सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. आरोग्याच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच या तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचे लक्षात आल्याने लगतच्या गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा दाट संशय आरोग्य खात्याला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असले तरी, या तालुक्यांच्या तुलनेत सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारी ९०८ इतकाच आहे. त्यामानाने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये हाच जन्मदर अधिक असल्याचे आरोग्य खात्याच्या पाहणीतून लक्षात आल्यामुळे याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आदिवासी व दुर्गम भाग असल्यामुळे प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी असल्या तरी, मुलींचे घटते प्रमाण पाहता, आदिवासी समाजातही मुलगी नको असा मतप्रवाह निर्माण होतो की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली असावी व त्यातूनच पुढे गर्भपाताला प्रोत्साहन मिळत असण्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केला आहे. राज्यात गर्भपातविरोधी कायदा असून, जिल्ह्यातही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्यामुळे गर्भपाताच्या सोयी नसल्यामुळे कदाचित सुरगाण्याला लागूनच गुजरात राज्य आहे. या राज्यात गर्भपात करून देणारी यंत्रणा कार्यान्वित असावी असा आरोग्य खात्याला संशय आहे. त्यामुळे सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन आहे काय याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सुरगाणा तालुक्यात बाळंतपणात महिला मृत्यूचे तर बालमृत्यूचे प्रमाणही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असून, चालू वर्षी १६९ मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सजग झाला आहे. माता व बालमृत्यूचे वाढते प्रमाण पाहता त्यामागच्या कारणांचाही शोध घेतला असता, प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व दारूचे व्यसन या दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे भुवनेश्वरी यांनी आरोग्य विभागाला ‘फोकस सुरगाणा’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तंबाखू व दारूमुळे आदिवासी स्त्री व पुरुषांचे वजन कमी होते, त्यामुळे कमी वजनाचे मुले जन्माला येतात व त्यातूनच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवून मृत्यूच्या घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी या भागात तंबाखू व दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद