शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मार्गदर्शक सूचना : जलसंपदाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पूररेषेतील हानीस महापालिका जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:53 IST

नाशिक : जलसंपदा विभागाचे कार्यक्षेत्र यापुढे नदीकिनारी पूररेषेची आखणी करण्याइतपतच मर्यादित राहणार असून, पूररेषेतील नियंत्रित व निषिद्ध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या आवश्यक कामांना जलसंपदा विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही.

ठळक मुद्देमार्गदर्शक सूचना जलसंपदा विभागाने जारी केल्यायामधील क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र संबोधले जाणार

नाशिक : जलसंपदा विभागाचे कार्यक्षेत्र यापुढे नदीकिनारी पूररेषेची आखणी करण्याइतपतच मर्यादित राहणार असून, पूररेषेतील नियंत्रित व निषिद्ध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या आवश्यक कामांना जलसंपदा विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, संभाव्य पुरामुळे होणाºया जीवित व वित्तीय हानीस महापालिका जबाबदार राहणार असल्याच्या मार्गदर्शक सूचना जलसंपदा विभागाने जारी केल्या आहेत.शासनाच्या जलसंपदा विभागाने पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टीने पूररेषेची आखणी करणे व निषिद्ध तसेच नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, नदीच्या उजव्या तीरावरील निळी पूररेषा ते नदीपात्र ते डाव्या तीरावरील निळी रेषा यामधील क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र संबोधले जाणार असून, नदीची निळी पूररेषा ते त्याच तीरावरील लाल पूररेषा यामधील क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र संबोधले जाणार आहे. निषिद्ध क्षेत्राचा उपयोग फक्त मोकळ्या जमिनीच्या स्वरुपात उद्याने, खेळाची मैदाने किंवा हलकी पिके घेणे अथवा सार्वजनिक शौचकूप व मलनि:स्सारण सुविधा यासाठीच करण्यात यावा. नियंत्रक क्षेत्राचा उपयोग हा सार्वजनिक हिताच्यादृष्टीने आवश्यक व अपरिहार्य मलनि:स्सारण योजना, पाणीपुरवठा पाइपलाइन, ड्रेनेज पाइपलाइन यासाठीच करावा. सदर उपयोगामुळे नदीप्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही, नदीची वहनक्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.प्रवाहाला अडथळा आणणाºया बांधकामाविरुद्ध मात्र मुख्य अभियंता कारवाई करण्यास सक्षम असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संभाव्य पुरामुळे होणाºया जीवित व वित्तीय हानीस यापुढे संबंधित विभाग अथवा महापालिका जबाबदार धरली जाणार आहे. त्यामुळे पूररेषेत होणाºया परिणामांबाबत महापालिकेची जबाबदारी वाढली आहे.