धरण परिसरातील गावे उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर जो गाळपेरा करतात त्यामुळे धरणातील जलप्रदूषण निर्माण होते. यामुळे धरणाच्या चारही बाजूंना तेलासारखा तवंग निर्माण होत आहे. या प्रदूषणामुळे धरणातील जलजीवन तर विस्कळीत झालेच आहे परंतू मानवी जीवनावरही याचा भविष्यात मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे धरण व परिसरातील होणारे जलप्रदूषण रोखणे काळाची गरज असल्याचे जलयुक्त शिवार अभियान समिती सदस्य डॉ किशोर कुंवर यांनी यावेळी सांगितले.यावेळी प्रा देशपांडे शिबिराचे कार्यक्र म अधिकारी राजेंद्र सुरवसे ,विकास थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते .शिबिरात ग्रामस्वच्छता, आरोग्य विषयक तपासणी शिबीर, जनजागृती रॅली, जल संधारण साठी सलग समपातळी चर तयार करणे, जि. प. शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व त्यांना भेटवस्तू देण्यात आली, परिसरातील महिलांना स्वच्छतेच्या बाबतीत मार्गदर्शन केले . शिबीर काळात डी. ए. सोनवणे, पायमोडे, मगरे,नेरपगार, वाठोरे,पवार,राकेश हिरे,के. पी. पवार आदींची विविध विविध विषयांवर व्याख्याने झाली.
हिवाळी श्रम संस्कार शिबिरात जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:47 IST
कळवण तालुक्यातील चणकापूर ,हुतात्मा स्मारक येथे गुरु दत्त शिक्षण संस्था संचालित जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी व डांग सेवा मंडळाचे कला महाविद्यालय अभोना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रम संस्कार शिबिरसंपन्न झाले.
हिवाळी श्रम संस्कार शिबिरात जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन
ठळक मुद्देगाळपेरा बाबत उपाय योजना करण्यासाठी गावकुसावर शेतकº्यांसाठी कार्यशाळा जलसंपदा व कृषी विभागानेआयोजित करायला हव्यात ,गाळ पेरा करणाº्या शेतकº्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व व जलप्रदूषणाची दाहकता समजून सांगायला हवी,तसेच जो पर्यंत धरण परिसरातील गावे हागणदारीमुक्त