शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचे मार्गदर्शन समाजासाठी उपयुक्त

By admin | Updated: June 27, 2017 00:54 IST

नाशिक : ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे समाजासाठी नेहेमीच उपयुक्त असते, असे मत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे समाजासाठी नेहेमीच उपयुक्त असते, असे मत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी व्यक्त केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरीकांची मंडळे संपूर्ण शहरभर पसरलेली असून विविध विधायक उपक्रम सातत्याने होत असतात. असे कार्यक्रमही समाजासाठी विचार प्रवण करणारे असतात, असेही यावेळी गांगुर्डे सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. मीना बापये यांनी ज्येष्ठ नागरिकांनी वाढत्या वयाबरोबर स्वत:ची वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात मंचचे सभासद असलेल्या ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये शंकर मराठे, कमळाबाई दांगट, सुमन शेपाळ, डॉ मुकुंद फाटक या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. तसेच यावेळी विधायक पत्रकारीते बद्दल लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांच्यासह महेंद्र महाजन व नीलेश अमृतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थीच्या वतीने सुमन शेपाळ आणि महेंद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मंचचे बाळकृष्ण दंडगावकर, ब्रीजमोहन चौधरी आदि उपस्थित होते. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी व जितेंद्र येवले यांनी तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गायिका गीता माळी यांची संगीत मैफली संपन्न झाली.