शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नवे नगरसेवक घेणार ज्येष्ठांचे मार्गदर्शन

By admin | Updated: May 29, 2017 00:02 IST

संगमेश्वर : मालेगाव शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली, तरी त्यांचे १६ विजयी उमेदवार नवखे असल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना त्यांना मार्गदर्शन करावे लागेल

राजीव वडगे। लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : मालेगाव शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली, तरी त्यांचे १६ विजयी उमेदवार नवखे असल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना त्यांना मार्गदर्शन करावे लागेल व तरच प्रभागाचे प्रश्न जलद गतीने सुटू शकतील. शिवसेनेचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. यात कविता बच्छाव (प्रभाग १ अ), प्रतिभा पवार (१ क), पुष्पा राजेश गंगावणे (८ अ), आशाबाई अहिरे (१० अ), जिजाबाई बच्छाव (१० ब), जयप्रकाश पाटील (१० क), नीलेश अहेर (१० ड), कल्पना विनोद वाघ (११ ब) व नारायण शिंदे (२ ड) हे नऊ उमेदवार प्रथमच विजयी होऊन नगरसेवक झाले आहेत. यात नारायण शिंदे यांना जि. प. सदस्यपदाचा अनुभव आहे. उर्वरित सर्व नवीन चेहरे आहेत. शिवसेनेचे जुनेजाणते सखाराम घोडके आठव्यांदा सभागृहात दिसणार आहेत, तर राजाराम जाधव व अ‍ॅड. ज्योती भोसले २००२ मध्ये विजयी झाले होते. जिजाबाई दिलीप पवार नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष होत्या. या सर्वांना नगरपालिका कामकाजाचा अनुभव आहे. त्यांना आपल्या नवीन सहकाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करावे लागेल. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम भागात नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात विजय देवरे (१ ड), छायाबाई शिंदे (२ ब), दीपाली विवेक वारुळे (८ ब), तुळसाबाई साबणे (९ अ), संजय काळे (९ ब), भरत बागुल (११ अ) व सुवर्णा राजेंद्र शेलार (११ क) हे सात उमेदवार नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. सुनील गायकवाड यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली, तर मदन गायकवाड सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. गायकवाड बंधूंना आपल्या सात नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन करून आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.एकूणच संगमेश्वर, कॅम्प, सोयगाव, भायगाव, कलेक्टरपट्टा यातील नागरी समस्यांसाठी ज्येष्ठ नगरसेवक सखाराम घोडके, सुनील गायकवाड आदींवर मोठी जबाबदारी असून, या नव्या प्रतिनिधींना कामकाजात मार्गदर्शन करून सक्रिय करावे लागेल. महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाला सक्रिय करण्यासाठी पश्चिम भागातील १६ नव्या चेहऱ्यांना ज्येष्ठ नगरसेवकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल तरच आपआपल्या प्रभागातील नागरी समस्या मार्गी लागू शकतील.