नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची आजवर झालेली तयारी व कामात येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेण्यासाठी जिल्'ाचे नवनियुक्त पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी १ जानेवारी रोजी सर्व संंबंधित यंत्रणेची बैठक घेणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. पालकमंत्री महाजन यांनी दुपारी साडेबारा वाजता नियोजन भवनात बैठक बोलविली असून, या बैठकीला सर्व संबंधित यंत्रणा, जिल्'ातील आमदार, खासदार, महापौर, त्र्यंबक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पालकमंत्री झाल्यानंतर महाजन यांची ही पहिलीच भेट असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे कुंभमेळ्याचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे महाजन यांच्यादृष्टीनेही ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पुरातत्व विभागाने अद्यापही आराखडा सादर केलेला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याला तत्काळ आराखडा सादर करण्याबरोबरच, कामे सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर येथे घाट विस्तारीकरण व अन्य कामांमध्ये पुरातत्व खात्याच्या परवानगीचा अडसर येत असल्याने त्यांनी तत्काळ कामांना अनुमती द्यावी, असेही सांगितले. या बैठकीत दूरसंचार विभागाने कुंभमेळ्यानिमित्त शहरात ३२ नव्याने टॉवर्स उभारण्याचे व त्र्यंबकला तीन टॉवर्स उभारण्याची माहिती दिली.
पालकमंत्री घेणार सिंहस्थ आढावा
By admin | Updated: December 31, 2014 00:52 IST