शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  पालकमंत्री छगन भुजबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 16:45 IST

नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड  करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली. 

ठळक मुद्दे आयोजकांकडून घोषणाउपाध्यक्षपदी कृषी मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ

नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड  करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली. 

नाशिक शहरात होणाऱ्या या संमेलनाच्या स्वागत समितीच्या  उपाध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,  राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बरोबरच  गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डाॅ. मो. स. गोसावी,प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीवर नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सल्लागार प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साहित्य संमेलनाच्या निमंत्रणापासून नाशिकला संमेलन घेऊन येण्यात सर्वाधिक मोलाचे योगदान असलेले लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची संमेलनाच्या कार्यवाहपदी, तर विश्वस्त हेमंत टकले यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षांना सल्लागार म्हणून सहकार्याध्यक्षपदावर ॲड. विलास लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सर्व समित्यांचे समन्वयक म्हणून विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नितीन मुंडावरे यांची साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामकाजासाठी विशेष नियुक्ती करण्यात आल्याचेदेखील टकले यांनी नमूद केले.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळGovernmentसरकार