नाशिक : महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर शहरातील नियोजित दहा मतमोजणी केंद्रांवर ठेवण्यात आलेल्या व्होटिंग मशीनच्या संरक्षणासाठी मतमोजणी केंद्रांवर विशेष पोलीस पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, पूर्व, आणि पश्चिम विभागीय केंद्रांची मोजणी विविध ठिकाणी होणार आहे. या केंद्रांवर दोन दिवसांपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, पोलिसांचे विशेष पथक इमारतीच्या आत आणि बाहेरही तैनात करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व केंद्रांवर फिरत्या पथकामार्फतही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा खडा पहारा
By admin | Updated: February 22, 2017 23:07 IST