शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

‘जी-एस-टी’ म्हणजे गुरूंवर, श्रद्धा, ठेवा

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

नाशिक : दिनविशेष असला की त्याविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्ट येऊन आदळतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अलीकडे कोणत्याही घटना, प्रसंग आणि दिनविशेष असला की त्याविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्ट येऊन आदळतात. सोशल मीडियावरील संवाद आणि भावना व्यक्त करण्याच्या या प्रकारामुळे कित्येकदा विषयाचे गांभीर्य हरविले जाते आणि चिमटेही काढण्याची संधी घेतली जाते. गुरुपौर्णिमा दिनालाही सोशल मीडियावर असाच अनुभव आला. अनेकांनी आपापल्या गुरूंविषयी मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली, तर काहींच्या विडंबन पोस्टमुळे मनोरंजनही झाले. यामध्ये ‘जी-एस-टी’ ही पोस्ट विशेष लक्षणीय ठरली.गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत व्हॉट््सअ‍ॅपवर आपल्या गुरूंबद्दल आणि आयुष्यात ज्यांच्यामुळे मार्ग सुकर झाला त्या ज्ञात-अज्ञात गुरूंबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट फिरल्या. या पोस्ट गुरूंचा आदर वाढविणाऱ्या नक्कीच होत्या. मात्र अशाही काही पोस्ट शेअर करण्यात आल्या की, ज्यामुळे गुरूंविषयीच्या संदेशाचे विडंबन करण्यात आल्याने मनोरंजनही झाले. प्रत्यक्ष आपल्या गुरूंविषयी नव्हे तर शब्दांचा खेळ करीत मित्रांना चिमटे काढणाऱ्या पोस्ट आणि मनोरंजन करणारे एसएमएस लक्षवेधी ठरले. आज आई आणि बायको दोघांना वंदन करा कारण आई म्हणते तुला बायको शिकवते तर बायको म्हणते तुला आई शिकवते. ही धमाल पोस्ट अनेकांच्या चेहऱ्यावर अनुभवाचे हसू देऊन गेली. पुरुषाच्या आयुष्यातील शेवटचा गुरु म्हणजे बायको, त्यानंतर त्याला कोणत्याही ज्ञानाची गरज लागत नाही आणि उपयोगही होत नाही ही पोस्टही अनेकांनी माना डोलावून मान्य स्वीकारली. तर दुसरीकडे आई-वडीलांमधील गुरु यांचीही आठवण करून देण्यात आली. आई, आमची सर्वप्रथम गुरु, त्यानंतर आमचे अस्तित्त्व सुरू आयुष्यातील पहिले गुरु माता-पिता, दुसरे गुरु शिक्षक त्यानंतर प्रत्येक व्यक्ती जिने कळत-नकळत जगण्याचा अर्थ शिकविला अशा सामाजिक आणि कौटुंबिक भान राखणाऱ्या संदेशही सुखावणारे होते. मात्र, सर्वाधिक पोस्ट व्हायरल झाल्या त्या विडंबनाच्या. घे रे, काही होत नाही, असे म्हणून प्यायला शिकविणाऱ्या आद्य गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पी पी काय होत नाही... असा दिलासा देऊन माझे जीवन धन्य करणाऱ्या सर्व गुरुंना माझा प्रणाम अशी पोस्ट मद्यसंस्कृती वाढविणाऱ्या मद्यप्रेमींना चपराक देणारी होती. एकीकडे असे चित्र असले तरी सामाजिक भान राखत अनेकांनी आपल्या गुरूंना वंदन करणारे संदेश सोशल साईटवर टाकले. यामध्ये आयुष्यातील व्यक्ती आणि गुरूप्रती संवेदना व्यक्त करणारे संदेशही होते.