शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ

By admin | Updated: February 3, 2015 01:20 IST

औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ

नाशिक : औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ केल्याची घोषणा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी केली. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नवव्या औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाट्यकर्मींच्या मागणीला प्रतिसाद देत गावित यांनी ही घोषणा केली. महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक विवेक गरुड, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सहायक कल्याण आयुक्त संजय धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते. नाटकाच्या सादरीकरणासाठी पाच हजारांऐवजी सात हजार, प्रथम विजेत्याला दहा हजारांऐवजी १५ हजार, द्वितीय विजेत्याला सात हजारांऐवजी दहा हजार, तृतीय विजेत्याला पाच हजारांऐवजी सात हजार ५०० रुपये दिले जातील, असे गावित यांनी सांगितले. याशिवाय परीक्षकांचे मानधनही एक हजारावरून दीड हजारापर्यंत, तर आदरातिथ्य खर्चही ४०० वरून ६०० करण्यात आल्याचे त्यांनी घोषित केले. विवेक गरुड यांनी या कार्यक्रमात खंत व्यक्त केली होती. नाटकांचा खर्च मोठा असून, बक्षिसांची रक्कम मात्र अपुरी आहे. त्यामुळे अनेकांना खिशातून पैसे घालावे लागत असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेच्या अनुदानात वाढ करावी, असे आवाहन त्यांनी केले, तसेच ‘नाटक खेळणारी मुलं’ ही कविताही सादर केली. त्यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत गावित यांनी सुधारित अनुदानाची या स्पर्धेपासूनच अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. संजय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षक विजय खानविलकर, प्रदीप पाटील, शरद तिळवणकर, प्रा. दिलीप जगताप, रोहिणी ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण निरीक्षक महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. कामगार कल्याण अधिकारी भावना बच्छाव यांनी आभार मानले.