शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सव मंडळांमध्ये वाढ

By admin | Updated: September 21, 2016 23:00 IST

आगामी मनपा निवडणूक : इच्छुकांकडून कार्यक्रमांचे आयोजन

इंदिरानगर : आगामी महापालिका निवडणुकीमुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवास महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, दांडियाप्रेमींचा उत्साहही शिगेला पोहचणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.सुमारे पाच महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊ ठेपली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये गणेशोत्सवात वर्गणी देण्याची जणू स्पर्धा सुरू झाली होती. त्यामुळे मंडळांना वर्गणीसाठी धावपळ करावी लागली नाही. ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक, विद्युत रोषणाई व सांस्कृतिक आणि स्पर्धाची रेलचेल झाली होती. यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते जमविणे आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच वर्गणीरूपातही पैशाची खैरात करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही इच्छुक उमेदवारांनी स्वत:च्या छबीचे होर्डिंग्ज प्रवेशद्वारावर उभे करण्याची जणूकाही स्पर्धाच झाल्याचे चित्र दिसून आले होते. हीच संधी पुन्हा इच्छुक उमेदवारांना नवरात्रोत्सवाद्वारे दुसऱ्यांदा आली आहे. यंदा मात्र मनपा निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवाच्या मंडळांची संख्या वाढणार आहे. यामध्ये राणेनगर मैदानावर सह्याद्री युवक मित्रमंडळाच्या दांडियाचे आयोजन करणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. तशीच परिस्थिती राजीवनगर मैदानावर अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने यंदा दांडियाच्या आयोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दांडियाप्रेमींना आकर्षित करण्याचे प्रयत्नइंदिरानगर, कलानगर, विनयनगर, वडाळागाव, समर्थनगर, सदिच्छानगर, सुचितानगर यांसह परिसरात इच्छुक उमेदवारांकडून नवरात्रोत्सवाच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत. यामध्ये आॅर्केस्ट्रा, गायन, सिनेकलावंत शो यांची लयलूट करण्यात येणार आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींची आणि मंडळांची दिवाळीच साजरी होणार आहे. तसेच जास्तीत जास्त दांडियाप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी आकर्षक बक्षिसे रोख तसेच वस्तु स्वरूपात देण्यात येणार आहेत.