शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरोधात घमासान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 01:01 IST

नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीला दिलेल्या मंजुरीचे तीव्र पडसाद शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने करवाढीविरोधी आक्रमक होत सत्ताधारी भाजपाविरोधी जोरदार घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना सदस्यांनी तर पीठासनावरच बैठक मारली आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड गोंधळातच महापौरांनी महासभा संपल्याचे जाहीर करत विषयपत्रिकेवरील सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी महासभेवर करवाढीचा विषय नसताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल नापसंती व्यक्त केली.

नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीला दिलेल्या मंजुरीचे तीव्र पडसाद शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने करवाढीविरोधी आक्रमक होत सत्ताधारी भाजपाविरोधी जोरदार घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना सदस्यांनी तर पीठासनावरच बैठक मारली आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड गोंधळातच महापौरांनी महासभा संपल्याचे जाहीर करत विषयपत्रिकेवरील सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी महासभेवर करवाढीचा विषय नसताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल नापसंती व्यक्त केली. स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत पाच वर्षांत १२० टक्के करवाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. या प्रस्तावित करवाढीला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला. शनिवारी होणाºया महासभेत या करवाढीचे पडसाद उमटणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार, महासभेत शिवसेनेसह कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या टोप्या व गळ्यात काळा स्कार्प घालत प्रवेश केला त्याचवेळी विरोधकांचा आक्रमक पवित्रा दिसून आला होता. श्रद्धांजली व अभिनंदनाच्या प्रस्तावांचे वाचन झाल्यानंतर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी नगरसचिवांना करवाढीसंदर्भात दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची मागणी केली परंतु, महापौर रंजना भानसी यांनी करवाढीचा प्रस्तावच आजच्या महासभेवर नसल्याने पत्राचे वाचन करण्याची गरज नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाले. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या सदस्यांनी ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘करवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसणाºया भाजपाचा निषेध असो’ अशी घोषणाबाजी करत पीठासनाकडे धाव घेतली. महापौरांच्या पुढ्यात प्रचंड घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी विरोधकांना राजदंड वाचविण्यासाठी धावपळशिवसेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. अशातच अंगावर निषेधाचे पोस्टर घेऊन आलेल्या संतोष गायकवाड यांनी पीठासनावर उभे राहून थेट राजदंडालाच हात घातला. त्यानंतर अजय बोरस्ते, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, संतोष साळवे, सुधाकर बडगुजर यांनी राजदंड काढून पळविण्याचा प्रयत्न केला. या पळवापळवीत काही सदस्य पीठासनावरून खाली कोसळले. राजदंडाची सुरक्षा सांभाळणारे नाईक मुश्ताक शेख यांनी राजदंड पळविण्यापासून रोखले. त्यांच्या मदतीला सुरक्षारक्षकही धावले.विरोधकांचा गोंधळ अशोभनीय मुळात स्थायी समितीने केलेला ठरावच अद्याप महासभेवर आलेला नाही. जर महासभेवर करवाढीचा विषयच नव्हता तर सेनेने दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची गरजच नाही. ज्यावेळी स्थायी समितीचा ठराव येईल, तेव्हा चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधकांनी घातलेला गोंधळ हा अशोभनीय आहे.- रंजना भानसी, महापौर