लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : राज्य सरकारच्या कृषी, सहकार विभागासह विविध विकास योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गटसचिवांचे विविध मागण्यांसाठी येथील बागलाणच्या सचिव पतसंस्थेत आज मंगळवारी ठिय्या देऊन असहकार आंदोलन छेडले. आंदोलनाचे नेतृत्व सचिव संघटनेचे बागलाण तालुका प्रतिनिधी दिनेश मोरकर यांनी केले. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली मात्र शेतकऱ्यांचा दुवा मानल्या जाणाऱ्या गटसचिवांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या निषेधार्थ राज्यातील गटसचिवांनी आजपासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सुनील देवरे, अनिल खरे, दिनेश मोरकर, अनिल बत्तीसे, श्यामसुंदर सोनवणे, गणेश वाघ, प्रशांत सोनवणे, प्रमोद पवार, जयवंत भामरे, राजेंद्र भारती, लक्ष्मण सोनवणे, आनंद साळुंखे, किरण खैरनार, सुनील हिरे, अशोक नरवडे, राजेंद्र खैरनार, विजय सूर्यवंशी, विष्णू जाधव आदी गटसचिव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.@शासन, सहकारी आणि व्यापारी बँका व त्यांचे कर्जदार शेतकरी यांच्या मधील गटसचिव हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. गावातील शेतकरी खातेदारांची, संस्थेचे सभासद, खातेदार यांची यादी तयार करणे, यातून कर्जास पात्र शेतकऱ्यांची निवड करणे, कर्ज मेळाव्यापूर्वी संबंधित बँकांना देणे अशी जबाबदारी सचिवांची आहे. त्यामुळे या असहकार आंदोलनामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीत मोठी अडचण निर्माण होणार आहे.
गटसचिवांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: June 28, 2017 00:39 IST