शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गट आरक्षणाच्या आडाख्यांचे ‘इमले’ जोरात

By admin | Updated: July 22, 2016 00:19 IST

जिल्हा परिषद निवडणूक : तीन पंचवार्षिकच्या आरक्षणाची घेतली माहिती

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट व गणांचे आरक्षण व रचना करण्यासाठी प्रशासनाने प्रारंभ करताच जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कोणते गट आरक्षित होणार आणि कोणते गट खुले होणार, याचे आडाखे बांधण्यात सुरुवात केली आहे.जिल्हा परिषदेच्या गट व गणांची पंचवार्षिक निवडणूक येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. २१ मार्च २०१७ पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करणे कायद्याने बंधनकारक आहे. मागील निवडणुकांचा अनुभव पाहता साधारणपणे जानेवारीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन फेब्रुवारी १५ ते २० दरम्यान मतदान व मतमोजणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचेही मतदान आणि मतमोजणी फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत गट व गणांच्या आरक्षणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. या चर्चेनुसार निफाड, सिन्नर व येवला तालुक्यातील दोन डझन जिल्हा परिषदेचे बहुतांश गट सर्वसाधारण किंवा इतर मागास प्रवर्गासाठी खुले होणार असल्याचा दावा केला आहे. तर कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील बहुतांश गट अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव राहणार असल्याचा दावा करण्यात आला. येत्या आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद गट व गणांच्या रचनेबाबत कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)