शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

शुक्रवारी होणार बकरी ईदचे सामूहिक नमाजपठण

By admin | Updated: September 23, 2015 00:33 IST

तयारी पूर्णत्वास : ईदगाह मैदान सोहळ्यासाठी सज्ज; बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गर्दी

नाशिक : मराठी दिनदर्शिकेमध्ये येत्या २४ तारखेला गुरुवारी बकरी ईदचा सण दर्शविण्यात आला आहे; मात्र गेल्या १४ तारखेला सोमवारी शहरात चंद्रदर्शन घडले नाही तसेच अन्य शहरांमधून चंद्रदर्शन झाल्याची ग्वाहीदेखील विभागीय चांद समितीकडे प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे बकरी ईदचा सण हा शुक्रवारी (दि. २५) साजरा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार असल्याने जय्यत तयारीला वेग आला आहे.इस्लामी कालगणनेतील अकरावा महिना ‘जिलकद’च्या २९ तारखेला सायंकाळी चंद्रदर्शनाची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन घडले नाही. बकरी ईदचा सण एक दिवस पुढे ढकलला गेला व गुरूवार ऐवजी शुक्रवारी बकरी ईद (ईद-उल-अज्हा)चे नमाजपठण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, असे सिरत व चांद समितीचे प्रवक्ते मीर मुख्तार अशरफी यांनी सांगितले. शहाजहांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ‘ईद-उल-अज्हा’ची विशेष नमाज अदा केली जाणार आहे. समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे व पारंपरिक पद्धतीने शांततेत बकरी ईदचा सण साजरा करावा, असे आवाहन खतीब-ए-शहर यांनी केले आहे. दरम्यान ईदच्या कपडे खरेदीसाठी बााजरपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. भद्रकाली येथील शिवाजी कापड बाजार, मेन रोड परिसरात खरेदीची लगबग रात्री उशिरापर्यंत दिसत होती. (प्रतिनिधी)