शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

मालेगावी पाच हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

By admin | Updated: February 1, 2015 00:21 IST

मालेगावी पाच हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

.मालेगाव : रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कारदिनानिमित्त येथील स्व. बाळासाहेब क्रीडा संकुलात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.येथील क्रीडा भारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्र, पतंजली योग विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने तरुणांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी तसेच शास्त्रोक्त व्यायाम प्रकार, सूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा, यासाठी दरवर्षी येथे सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.क्रीडा भारतीचे जिल्हा कार्यवाह तुकाराम मांडवडे यांनी क्रीडागीत गायन केले. तहसीलदार दीपक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख भाग्येश कासार यांनी प्रास्ताविक केले. भानू कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रविश मारू यांनी आभार मानले. सर्व शाळांतील सहभागी संघांना सहभागाबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. क्रीडा भारतीचे प्रांतिक उपाध्यक्ष नितीन पोफळे, योग विद्याधामचे अध्यक्ष दिनेशकुमार लोढा, विवेकानंद केंद्राचे डॉ. सुरेश शास्त्री, जयवंत जाधव, पतंजली योग विद्यापीठाचे डी. टी. परचुरे, नलिनी निकम, सौ. माधुरी पाठक, सौ. एम. पी. मोरे, प्रा. नितीन हिरे व्यासपीठावर उपस्थित होते. क्रीडा भारतीचे अध्यक्ष दादा बहिरम, दीपक पाटील, प्रवीण चौधरी, रविराज सोनार, निखील पोफळे, गणेश जंगम, विवेक कासार, शरद चित्ते, प्राचार्य के. ज. चंदन, देवेंद्र अलई, मेघा सूर्यवंशी, ओम शर्मा आदि उपस्थित होते.(वार्ताहर)