नाशिक : मेहमान मेरे, काहे मान करो सखीरी अब... या राग मधुमतीमधील बंदिशीचे सादरीकरण करत शास्त्रीय गायक निनाद शुक्ल यांनी उपस्थितांची मने जिंकली. गंगापूरोड धबधबा येथील शंकराचार्य न्यास संचलित बालाजी मंदिरात शास्त्रीय गायन संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निनाद शुक्ल यांनी राग मधुमती, राग मेघमल्हार यांच्यासह मेवाती घराण्याचे गायक पं. जसराज यांचे ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या भजनाच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायक निनाद शुक्ल यांनी अंधत्वावर मात करून डॉ. विजय साठ्ये यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवत आहेत. अंध असतानाही शुक्ल यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गाण्यांना उपस्थित श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.निनाद शुक्ल यांना तबल्यावर विनोद पटवर्धन, संवादिनीवर जयेंद्र पाबारी आणि तानपुऱ्यावर स्वाती शुक्ल यांनी साथसंगत केली. कार्यक्रमात मंदिराचे विश्वस्त अशोक खोडके यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला, तर आनंद जोशी यांनी कलाकारांचा सत्कार केला. विलास पूरकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी राजाराम मोगल, आशिष कुलकर्णी, अशोक खोडके, नरेंद्र चांदवडकर, अवधुत देशपांडे, प्रमोद भार्गवे, हेमंत कुलकर्णी, महेश हिरे, आनंद जोशी यांच्यासह रसिकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आनंद शुक्ल यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Updated: October 28, 2015 22:27 IST