शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

आश्रमशाळेतून धान्याची विक्र ी

By admin | Updated: December 31, 2016 01:14 IST

मानूर : विद्यार्थ्यांची तक्रर; अधीक्षक निलंबित, मुख्याध्यापकाला नोटीस

कळवण : महाराष्ट्र- गुजरात हद्दीजवळील अतिदुर्गम भागातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून अन्नधान्य खुल्या बाजारात राजरोसपणे विक्र ीसाठी नेले जात असून, या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीच हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर कळवण एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानूर आश्रमशाळेला तातडीने भेट देऊन पाहणी केली. हा सर्व गैरकारभार ऐकून ते अंचबित झाले. तत्काळ अधीक्षक शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई तर मुख्याध्यापक भामरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कळवण येथील आदिवासी बचाव समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यास बागलाण तालुक्यातील मानूर शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आश्रमशाळेतील अनागोंदी कारभाराची माहिती दिल्यानंंतर सदर प्रकार उघडकीस आला. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी हा गैरकारभार अन् प्रशासनाकडून होत असलेल्या गैरप्रकाराला वाचा फोडली. याबाबत प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांच्याकडे निवेदन दिल्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या  तक्रारीची तत्काळ दखल घेऊन पाहणी केली असता अन्नधान्यात तफावत जाणवली.  शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून अन्नधान्याची होत असलेली चोरी व विक्रीबाबत अधीक्षक शिंदे यांना विद्यार्थ्यांनी जबाबदार धरले असून, सदर घटना पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघ्याची भूमिका घ्यावी असा सज्जड दम अधीक्षक शिंदे यांनी दिला होता. तसे न केल्यास दहावीची परीक्षा पास होऊ देणार नाही, अशी धमकी आदिवासी विद्यार्थ्यांना अधीक्षकांकडून दिली गेल्याची  तक्रार निवेदनात करण्यात आली होती. प्रकल्प अधिकारी गंगाथरण डी. यांनी आश्रमशाळेला भेट देऊन दोन तास विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली व आश्रमशाळेची तपासणी केली. कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिलेले जबाब यांच्यात विसंगती जाणवली. अधीक्षक शिंदे यांनी अन्नधान्याची होणाऱ्या खुलेआम विक्रीबाबत आरोप फेटाळून लावत विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणुकीवर आक्षेप घेत तक्र ारीचा पाढा वाचला व विद्यार्थी आपल्यावर खोटा आरोप करीत असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. सटाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली .मानूर येथील आश्रमशाळेतील अन्नधान्याची खुल्या बाजारातील विक्र ीबाबतचा गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्याध्यापक भामरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून अधिक्षक शिंदेवर निलंबनाची कारवाई केली आहे . तर रोंजदारी वर्ग चारचे तीन कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. (वार्ताहर)