शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:27 IST

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

पंचवटी : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.  पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात सरदार पटेल यांची जवळपास ६० दुर्मीळ छायाचित्रे मांडण्यात आली होती. यामध्ये सरदार पटेल यांच्या विद्यार्थिदशेपासून ते जन्मघर, कुटुंबातील सदस्य तसेच सत्याग्रह व भारत एकीकरण करताना संस्थानिकांशी संबंधित फोटो या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते. याशिवाय आरपी व गोदावरीबाई विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरदार पटेल यांच्या रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पटेलांच्या जीवनावर आधारित समूहगान सादर केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल मेहता, उर्विश जोशी, गोपाल पटेल मोहन पटेल, अभय चोकसी आदींसह शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादननाशिक : नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रभारी मिलिंद कोळी, युवक काँग्रेसचे प्रभारी ब्रिजमोहन दत्त आणि प्रशांत उगले यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. माजी मंत्री शोभा बच्छाव यांनीदेखील इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला.  सूत्रसंचालन वसंत ठाकूर यांनी केले. बबलू खैरे यांनी आभार मानले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, वत्सला खैरे, स्वप्निल पाटील, आशा तडवी, आर. आर. पाटील, बबलू खैरे, लक्ष्मण जायभावे, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते.सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादननाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महानगरतर्फे वसंतस्मृती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी विपुल मेहता, नंदकुमार देसाई यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सरदार पटेल यांच्या जीवन- प्रवासावर मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी माहिती दिली. यावेळी भारती बागुल, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, सोनल दगडे, वसंत उशीर आदींचीही यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी, तर आभार उदय रत्नपारखी यांनी मानले. यावेळी अरुण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष माणिकराव देशमुख, शैलेंद्र आजगे, विस्तारक राम बडोदे, मनोज दिवटे, सुखदेव ढिकले, विजय महाले, शिवम शिंपी, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, यश जंगम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक