ओझरटाऊनशिप : मोदी सरकारला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि नाशिकच्या दोन्ही मोदी समर्थक खासदारांचा विजय झाल्यामुळे ओझरगाव व परिसतरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट पसरलेला होता. जसजसे निकाल जाहीर होत गेले तशी बाजारात गर्दी वाढत गेली. हेमंत गोडसे आणि हरिषचंद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच बाजारपेठेत फटाक्याची आतषबाजी झाली. निकाल लागल्यानंतर वीर तानाजी मित्र मंडळ आणि शिवाजी चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)
ओझरला आनंदोत्सव
By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST