शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनारी येथे शहीद राकेश आणेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:54 IST

सिन्नर: तालुक्यातील सोनारी येथे लान्सनायक शहीद राकेश आणेराव यांच पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देस्वदेशी वस्तुंचा वापर ही शहीदांना खरी श्रद्धांजली

सिन्नर: तालुक्यातील सोनारी येथे लान्सनायक शहीद राकेश आणेराव यांच पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी सरपंच किसन शिंदे, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे, उद्योजक तानाजी पवार , आझाद पतसंस्थेचे अध्यक्ष युनुस शेख,कोनांबेचे माजी सरपंच संतोष डावरे, वीरपिता राकेश आणेराव , शहीद राकेश आणेराव यांचे बंधु सैन्यातील जवान सुदेश आणेराव, योगेश आणेराव , वसंत शिंदे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. पंधरा वर्षापूर्वी जम्मु काश्मिर येथील निशांतबाग श्रीनगर परिसरात 13 राष्ट्रीय रायफल्स चे जवान ऑपरेशन रक्षक तीन मोहिम राबवत होते. यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सोनारीचे लान्सनायक राकेश आणेराव यांना वीरमरण आले होते. पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त यावेळी शहीद राकेश आणेराव यांच्या पुतळ्याचे राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पुजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शहीद राकेश आणेराव स्मारक परिसरात राजाभाऊ वाजे , शरद रत्नाकर, वसंत गोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वदेशी वस्तुंचा वापर ही शहीदांना खरी श्रद्धांजली असल्याने स्वदेशीचा संकल्प करण्यात आला. चिनी वस्तुंचा वापर न करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. शहीद राकेश आणेराव स्मारक समिती व सोनारी येथील परममित्र वाळीबा शिंदे सर शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी पंढरपूर वारीतील दिंडीसाठी दरवर्षी 1100 निधी व औषधे दिली जाते. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही मदत देण्यात आली. प्राचार्य शरद रत्नाकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुदाम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

 

टॅग्स :Martyrशहीदsinnar-acसिन्नर