शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराजा अग्रसेन यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:13 IST

समाजवाद व अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अग्रवाल समाजाकडून सेवा व परोपकाराचे कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी काढले.

नाशिक : समाजवाद व अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अग्रवाल समाजाकडून सेवा व परोपकाराचे कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी काढले.अग्रवाल सभेतर्फे आयोजित श्री अग्रसेन जयंती सप्ताहात अग्रएकता रॅली, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच शेअर स्ट्रिट यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहाचा समारोप ठिकठिकाणी प्रतिमापूजन व गुणगौरव कार्यक्रमाने झाला. याअंतर्गत आडगाव येथील बाला सुंदरी माता मंदिरात प्रतिमापूजन करण्यात आले. रविवार कारंजा येथे महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा आदि मान्यवरांच्या हस्ते, तर महात्मानगर येथे आमदार सीमा हिरे, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे आदींच्या हस्ते महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महिला मंडळातर्फे गुरुवारी (दि.२१) दुपारी सावरकरनगर ते नक्षत्र लॉन्सपर्यंत कलश यात्राही काढण्यात आली. यानंतर झालेल्या मुख्य जयंती समारंभात सभेतर्फे व अग्रसेन विश्वस्त ट्रस्टतर्फे विविध विद्या शाखातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील उद्योगपती चंद्रप्रकाश जाजोदिया व मालेगाव येथील महेश पाटोदिया यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार यांनी प्रास्ताविक केले. जयंती संयोजक सुशील केडिया, डॉ. बाबुलाल अग्रवाल आदींनी पाहुण्याचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर सभेचे कार्याध्यक्ष आर्कि.सुरेश गुप्ता, विभागीय अध्यक्ष ताराचंद गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष भगवानदास अग्रवाल, दिनेश अग्रवाल, श्याम ढेडिया, महिला पदाधिकारी प्रेमा हिसारिया, सपना अग्रवाल, विनिता पोद्दार अंकित अग्रवाल आदि पदाधिकारी उपस्थित होते. महामंत्री विमल सराफ यांनी आभार प्रदर्शन केले.