नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोेजन करण्यात आले होते. यानिमित्त या थोर पुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. अनेक शाळा, महाविद्यालयांतही यानिमित्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मनपा शाळा क्रमांक ६महापालिका शाळा क्रमांक ६ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक पवार, ज्येष्ठ शिक्षक पाटील यांनी प्रतिमापूजन केले. तसेच अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भामरे, कापसे यांची भाषणे झाली. डॉ. आंबेडकर फाउंडेशनलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपत हिवराळे, रवि पगारे, जीतू बोरवे, तातू मोरे, किरण गालफाडे, सचिन अहिरे, विकी गवळी आदि उपस्थित होते. नवरचना विद्यालयनवरचना विद्यालयाच्या प्राथमिक विभागात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक गोसावी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रीती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रियंका गोवर्धने यांनी केले. साक्षी सोनजे, मयूर कोरडे यांचीही भाषणे झाली. आभार अनिता अहिरे यांनी मानले. कार्यक्रमास वायकडे, पटेल, भंवर, अहिरे आदि उपस्थित होते. शक्ती विकास अकॅडमीशक्ती विकास अकॅडमीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर जगताप यांनी प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी दीपक जगदाळे, राकेश खरे, गोपाल न्हावी, अमोल एखंडे, ऐश्वर्या बाथम, उत्तम दोंदे आदि उपस्थित होते.
लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
By admin | Updated: August 2, 2016 01:45 IST