सिन्नर : येथील तहसील कार्यालयात देवमामलेदार महाराज तथा यशवंतराव कुलकर्णी यांना १२७व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सी.बी. मरकड यांच्या हस्ते देवमामलेदारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विशेष कार्यक्रम अधिकारी तथा नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी देवमामलेदार यांच्या कार्याविषयी उपस्थिताना माहिती दिली. याप्रसंगी देव मामलेदार यांच्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी सुधाकर भार्गवे, शिवराम तांबे, अमोल गंगावणे, बाळू गवारे, गणेश गवळी, ए.जी. लोखंडे, विनोद लोंढे, ओमकार राजगुरु, अशोक भागवत, विलास साळवे, अनिल ढोमसे, डी.डी. माळी, किशोर तुपे, नितीन नंदन, नवनाथ सोनवणे, विलास भाटजिरे आदि उपस्थित होते. के.जे. लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दत्ता सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास गणोरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सिन्नर येथे देवमामलेदार महाराज यांना अभिवादन
By admin | Updated: December 20, 2014 00:37 IST