शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हिरवाईने नटला इगतपुरी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:57 IST

घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची रीघ : पावसामुळे धबधबे प्रवाहित

घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात सातत्याने वरुणराजाची कृपावृष्टी होत असते. इगतपुरी तालुक्यातील निसर्गराजी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आलेली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे थळ घाट, भावली धरण परिसर, वैतरणा धरण परिसर आदी ठिकाणचे धबधबे प्रवाहित होऊ लागल्याने या भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. डोंगर-दºयांमुळे सुखावणाºया या वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मुंबई-ठाणे तसेच कोकण परिसरातून पर्यटक मोठ्या संख्येने इगतपुरी परिसरात येत असतात. विशेषत: शनिवार-रविवारी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पर्यटकांची मांदियाळी जमा झाल्याचे दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी पर्यटकांनी या परिसरात काजवा महोत्सवाचा आनंद लुटला. आता पावसाळ्यातील सुखावणारे वातावरण पर्यटकांना भुरळ पाडत आहे. युवकांना रोजगारयामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील डोंगर दºयांवर हिरवाईने शाल पांघरली असल्याने निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. दरम्यान, धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांकडून थेट धबधब्याजवळ जाण्याचे प्रकार घडत आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.