शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

गोदावरी स्लॅबबाबत कृती आराखडा सादर करा हरित न्यायाधिकरण : त्र्यंबक नगरपालिकेस दिले आदेश

By admin | Updated: May 16, 2014 00:28 IST

नाशिक : गोदावरी नदीवर असलेला स्लॅब आणि पर्यावरण कायम राखण्यासाठी अन्य घटकांचा विचार करून येत्या चार आठवड्यांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाने त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.

नाशिक : गोदावरी नदीवर असलेला स्लॅब आणि पर्यावरण कायम राखण्यासाठी अन्य घटकांचा विचार करून येत्या चार आठवड्यांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाने त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत. गोदावरी नदीवरील स्लॅब हटविणे आणि अन्य मागण्यांसंदर्भात राजेश पंडित, निशिकांत पगारे आणि ललिता शिंदे यांनी हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. त्यावर चर्चा करण्यात आली. बीओडी म्हणजेच बायोऑक्सिजनल डिमांड प्रचंड असून, बंदिस्त गोदापाात्रात तर ३०० ते ५७५ इतकी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. नदी मोकळी आणि प्रवाही ठेवून पाइपलाइनमधून सांडपाणी सोडण्याची गरज असताना, त्र्यंबकमध्ये मात्र मलजल नदीपात्रात आणि नदी पाइपातून सोडण्याचा अजब प्रकार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. त्र्यंबकेश्वर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यावर पर्याय म्हणून नदीपात्रावर स्लॅब टाकण्यात आल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर न्यायाधिकरणाने भारतातील सर्व नद्यांवर असाच स्लॅब टाकून बंदिस्त करायचे का, असा प्रश्न केला. त्यानंतर न्यायाधिकरणाने त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना नदीत मलजल सोडणे कधी थांबविणार, नदीवर स्कॉय वॉक किंवा उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय शक्य आहे काय आणि महत्त्वाचे म्हणजे नारायण नागबली विधीच्या वेळी केले जाणारे पिंडदान तेथील पुरोहितांच्या मदतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर नेणे शक्य आहे का आणि ते शक्य नसेल तर नाशिक महापालिकेशी चर्चा करून नाशिकमधील खत प्रकल्पावर नेणे शक्य आहे काय याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी बोलून चार आठवड्यांत कृती आराखडा सादर करावा, असे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार आहे.