शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नार-पार प्रकल्पासाठी हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:48 IST

सटाणा : उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरणाºया नार-पार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच गुजरात राज्याशी करार करण्यात येऊन प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुभाष भामरे : लवकरच गुजरातशी करार; साल्हेरला विविध खातेप्रमुखांसह सरपंचांची बैठक गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते हरणबारी धरणात टाकण्यात येणार

 

सटाणा : उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरणाºया नार-पार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच गुजरात राज्याशी करार करण्यात येऊन प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजनांचा आढावा घेण्यासाठी व सांसद आदर्श गाव साल्हेरचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात शनिवारी (दि. १०) सायंकाळी साल्हेर येथे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध खातेप्रमुख व तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.प्रारंभी डॉ. भामरे यांच्या हस्ते साल्हेर येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल मनोºयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी डॉ. भामरे यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी साल्हेरला सांसद आदर्श गावमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा डॉ. भामरे यांनी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. शेषराव पाटील, डॉ. विलास बच्छाव, गजेंद्र शंकपाळ, जिल्हा परिषद सदस्य लता बच्छाव, मीना मोरे, कन्हू गायकवाड, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, उपसभापती शीतल कोर, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, बिंदूशेठ शर्मा, आबा बच्छाव, डॉ. दिग्पाल गिराशे, नीलेश पाकळे, मंगेश खैरनार, राहुल सोनवणे, साहेबराव सोनवणे, शंकरराव सावंत, अविनाश सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. आर. पवार, कळवण प्रकल्प अधिकारी मित्तल, उपविभागीय कृषी अधीक्षक कैलास खैरनार, प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुंवर, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस तसेच जलसंपदा विभागाचे खातेप्रमुख, तापी खोºयाचे अभियंता आदी उपस्थित होते.सांसद आदर्श गाव साल्हेरचा एप्रिल महिन्यात गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. मुलभूत सुविधांबरोबरच पर्यटन स्थळ विकिसत करण्याच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. अपघात विमा योजना तसेच शासनच्या विविध योजनांच्या माहितीसाठी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. आरोग्यासाठी या गावातील प्रत्येक नागरिकाला क्र ेडीट कार्ड देण्यात येईल, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच कृषी विकासासाठी प्रयत्न केला जाईल जेणेकरून त्याचा प्रत्येक व्यक्तीला लाभ होईल अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या आराखड्याचे वाचन होऊन मेच्या पहिल्या आठवड्यात त्याला मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात येईल.- बी. राधाकृष्णन,जिल्हाधिकारी,नाशिक साल्हेर होणार मॉडेल व्हिलेज.....डॉ. भामरे यांनी साल्हेरची सांसद आदर्श गाव म्हणून घोषणा केली. विविध शासकीय योजना राबवून साल्हेर एक स्वयंपूर्ण गाव म्हणून नावारूपाला येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. साल्हेर गावाला ऐतिहासिक वारसा असून, याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी शत्रूशी सामना केला होता. गुजरातच्या सीमेवरील नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या साल्हेर गावासोबतच चाळीस वाड्यापाड्यांचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय पेय जल योजनेंतर्गत साल्हेरसह नऊ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याचेही डॉ. भामरे यांनी जाहीर केले. ही योजना सुमारे पाच कोटी रु पये खर्चाची असून, केळझर मध्यम प्रकल्पातून ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. लवकरच योजनेचा आराखडा तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वाघंबा वळण योजनेसाठी पावणेदोन कोटी... बागलाण तालुक्यातील सिंचन योजनांना गती देण्यासाठी पाणी उपलब्धता या तांत्रिक पूर्ततेची आवश्यकता आहे. पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यामुळे हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोच कालवा आणि चारी क्र मांक ८ च्या प्रलंबित कामाचा प्रश्न सुटला आहे. आता उजव्या कालव्यासाठी पाणी उपलब्धता ही मोठी समस्या असून, आघाडी सरकारने या कालव्याच्या प्रस्तावावर मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद करण्याचे पाप केले आहे. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण करून उजळ माथ्याने फिरत असलेल्या पुढाºयांना जनतेने जाब विचारण्याची गरज असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. आगामी काळात हरणबारी उजवा कालवा आपले लक्ष्य असून, त्यासाठी शंभर दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी ३८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले. उर्वरित पाणी उपलब्ध करण्यासाठी वाघंबा वळण योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी पावणेदोन कोटी रु पयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते हरणबारी धरणात टाकण्यात येणार आहे. तसेच दुसºया टप्प्यात पाच वळण योजनांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, लवकरच त्यालादेखील मंजुरी देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.