शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

प्रवेशोत्सवाने गजबजल्या शाळा

By admin | Updated: June 16, 2017 00:21 IST

शाळेची पहिली घंटा : वाजत-गाजत मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त गावोगावी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभातफेऱ्या काढल्या. नवागतांच्या स्वागताची प्रत्येक शाळेत जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यांचे औक्षण करण्यासह गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना मिठाई म्हणून चॉकलेट व लाडू वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत पाठ्य-पुस्तकांचे वितरण करण्यात आले. दापूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. पेठ : तालुक्यातील जवळपास २२० प्राथमिक, माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांनी शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.सकाळपासूनच तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यात चिमुकल्यांनी शाळेच्या आवारात हजेरी लावली होती. पारंपरिक पद्धतीने नव्याने दाखल होणाऱ्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन बालकांचे जंगी स्वागत करण्यात आले. आंब्याच्या पानांचे तोरण, झेंडूच्या फुलांनी सजवलेले वर्ग व सडा रांगोळ्यांनी सजवलेला शाळेचा परिसर नवागतांना आकर्षित करून घेत होता.सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके हातात पडल्याने मुलांना अधिक आनंद झाल्याचे दिसून येत होते. जिल्हा परिषद शाळा, करंजाळी व कोहोर येथे सभापती पुष्पा गवळी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मुलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सदस्य पुष्पा पवार, नंदू गवळी, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, गटशिक्षणाधिकारी कैलास माळवाळ, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, केंद्रप्रमुख लता आढाव, वाल्मीक सावळे उपस्थित होते.