शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडजवळ चाडेगाव शिवारातील द्राक्षमळ्यात बिबट्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:51 IST

नाशिकरोडजवळ चाडेगाव शिवारातील एका द्राक्षाच्या मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांच्या कानी आल्या. शेतकºयांनी मळ्याच्या दिशेने धाव घेतली असता भला मोठा बिबट्या बघून त्यांची पाचावर धारण बसली.

नाशिक : नाशिकरोडजवळ चाडेगाव शिवारातील एका द्राक्षाच्या मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांच्या कानी आल्या. शेतकºयांनी मळ्याच्या दिशेने धाव घेतली असता भला मोठा बिबट्या बघून त्यांची पाचावर धारण बसली.  महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारातील संदीप पांडुरंग वाघ यांच्या द्राक्षमळ्यात मृतावस्थेत पडलेल्या डुकरावर ताव मारण्याच्या इराद्याने बिबट्याने हजेरी लावली; मात्र डुकरांच्या उपद्रव थांबविण्यासाठी लावलेल्या तारेच्या जाळ्यात तो अडकला. सुटकेसाठी सुमारे पाच तास त्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र बिबट्याला यश आले नाही. सदर घटनेची माहिती शेतकºयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याला कळविली व पोलिसांनी तत्काळ वनविभागाला पाचारण केले. नाशिक पश्चिम विभागाच्या उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलिल मती यांनी तत्काळ रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना केले. प्रौढ नर बिबट्या संपूर्णत: खुला होता केवळ त्याचा मागील पाय आणि शेपटीला तारेचा वेढा बसलेला होता त्यामुळे त्याला निसटता येत नव्हते. बिबट्या प्रचंड आक्रमक झाल्याने त्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकापुढे उभे राहिले. पोलिसांनी बघ्यांची गर्दी थोपवून धरली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षकांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळून बिबट्याला ‘ट्रॅन्क्युलाइज गन’द्वारे डार्ट देऊन बेशुद्ध केले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट मादीने शेतकºयांना दर्शन दिले. मळे भागात पिंजरा तैनात करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.डुकरांच्या उपद्रवाने निमंत्रणनाशिकरोडजवळील सामनगाव, चाडेगाव, गोरेवाडी, एकलहरारोड, पळसे या मळे भागात मोकाट कुत्रे, डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या द्राक्ष मळ्यात पोहचला असावा, असा दावा वनविभागाच्या अधिकाºयांनी केला आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.उसाच्या शेतातून बिबट्या द्राक्षबागेतवाघ यांच्या द्राक्षबागेला लागून उसाचे शेत आहे. या शेतात जंगली डुकरे अधिक आहे. डुकरांचा पाठलाग करताना बिबट्या शेतात आल्याचे प्रत्यक्षदर्शी अनिल सातपुते यांनी सांगितले. यावेळी डुकरावर बिबट्याने हल्लाही चढविला; मात्र द्राक्षबागेला लागून असलेल्या तारेसह जाळ्यात बिबट्या अडकून पडला. बिबट्याच्या हल्ल्याच एक डुक्कर मृत्युमुखी पडले आहे. उसाच्या शेतात डुकरांची संख्या अधिक असून, बिबट्या व डुकरांमध्ये नेहमी झटापट होत असते, अशी माहिती सातपुते यांनी दिली.

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग