शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात तीव्र संताप

By admin | Updated: February 4, 2017 01:19 IST

प्रादेशिक परिवहन विभाग : दर महिन्याला होणारे तालुकास्तरीय शिबिरे बंद

येवला : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून प्रत्येक महिन्यात ग्रामीण भागातील जनतेच्या कामासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र आता फेब्रुवारी २०१७ पासून सदर शिबिरे घेण्याचे बंद करण्यात आल्याचे कार्यालयाने जाहीर केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. महिन्याच्या नियोजनाप्रमाणे परिवहन अधिकारी येवल्यात विश्रामगृह परिसरात आले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिकाऊ परवाना देण्याचे काम होणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने येथे आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता शिकाऊ परवाना काढण्यासाठी संबंधितांना आॅनलाइन अपॉइण्टमेंट घेऊन नाशिक येथे जावे लागणार आहे. त्यात वेळ व आर्थिक नुकसानही होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येक महिन्याला शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरांचे वेळापत्रक कार्यालयाने आगोदरच जारी केले आहे. त्यानुसार आज येथील शासकीय विश्रामगृहावर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात नेमकी कोणती कामे होणार, हे निश्चित नसल्याने परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने विश्रामगृह येथे हजर होते. येत्या काही दिवसात पोलीस विभाग व परिवहन विभाग यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. या दोन्ही विभागात चालक वाहन परवाना बंधनकारक असल्यामुळे आज येथे इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र काम न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. परिवहन कार्यालयाने अचानकपणे निर्णय घेतला असून, प्रसिद्धिमाध्यमाद्वारे ग्रामीण भागातील जनतेसाठी हा निर्णय जाहीर केला असता तर आज आलेल्या नागरिकांची हेळसांड झाली नसती अशा प्रतिक्रि या नागरिकांनी व्यक्त केल्या तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हट्टापाई ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय व हेळसांड होत असल्याची प्रतिक्रि या अनेकांनी व्यक्त केली.नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या अनाठायी भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन सारथी प्रणाली सुरु असून, तेथे शिबिरे व इतर सर्व कामे वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत आहेत. नाशिक विभागाला अशी काय अडचण आहे, असा सवाल विचारला जात आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या १ आणि २ तारखेला शिबिराचे आयोजन करण्यात येत असे. आज पुनर्नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने आली होती. मात्र काम न झाल्यामुळे वाहनधारकांना परत जावे लागले. आता ट्रॅक्टर व इतर वाहने पुनर्नोंदणीसाठी नाशिक येथे परिवहन विभागाच्या मुख्यालयात घेऊन जावी लागणार आहेत. (वार्ताहर)