शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसातून वाचविलेली द्राक्षे युरोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:14 IST

भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : पुरणगाव येथील शेतकऱ्याच्या प्रयोगाला यश; आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने समाधान

जळगाव नेऊर : भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.गणेश वरे यांनी दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेऊन यावर्षी उत्कृष्ट गुणवत्तेचा माल निर्यात योग्य द्राक्ष उत्पादन घेऊन युरोप येथील बाजारपेठेत पाठविला. आपल्या शेतात सतत नवनवीन पिकांची लागवड करून नवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून गणेश वरे यांची ओळख आहे. त्यांनी शेतात कारले, भोपळे, टमाटे, मेथी, कोथिंबीर, मका, कांदे, द्राक्ष अशा विविध पिकांची लागवड करीत निरीक्षण, प्रयोग व अद्ययावत तंत्राच्या माध्यमातून शेती फुलविली आहे.इच्छाशक्तीची जोड असल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. बाजारात मालाला दर कमी असले तरी अधिक उत्पन्न व उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर चांगला पैसा कमविता येतो. आता यापुढे आधुनिक तंत्र वापरून संधीचा शोध घेऊन योग्य पिकाची निवड करून शेतात वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक प्रगती करता येईल, असे गणेश वरे सांगतात.

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन, मीडियाचा तसेच स्थानिक कृषी सेवा केंद्रांचा सल्ला घेऊन योग्य व कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य झाले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे फळ नक्कीच मिळते. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेली बाग मेहनतीने सावरली असून, गुणवत्तेची द्राक्ष युरोपला निर्यात केल्याचे समाधान मिळत आहे.- गणेश वरे, द्राक्ष उत्पादक, पुरणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती