शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

विद्युततारा कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त

By admin | Updated: March 22, 2017 00:12 IST

दिंडोरी : पॉवरग्रीड वाहिनीचे काम सुरू असताना विद्युततारा द्राक्षबागेवर कोसळल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त होऊन सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना राजापूर येथे घडली.

दिंडोरी : पॉवरग्रीड वाहिनीचे काम सुरू असताना विद्युततारा द्राक्षबागेवर कोसळल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त होऊन सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना राजापूर येथे घडली. याबाबत प्रांताधिकारी उदय किसवे यांना निवेदन देण्यात आले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमदार नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीची पाहणी केली असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. असे प्रकार घडण्याची भीती होती म्हणूनच शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होता. प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्या व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार झरिवाळ यांनी केली आहे. राजापूर येथील शिवारातील गट नंबर ५७ मध्ये पॉवरग्रीडच्या टॉवरची उभारणी चालू असताना टॉवर उभे करण्यासाठी बांधलेला दोरखंड शेजारी असलेल्या बागेवरून जात असल्याने टॉवर बॅलन्स करताना दोराचा वापर करीत होते. त्यावेळेस मी याची पूर्वकल्पना वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पॉवरग्रीड अधिकारी सिंग यांना छायाचित्र व एसएमएसद्वारे देत होतो. परंतु त्यांनी दखल न घेतल्याने आमच्या बागेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. म्हणजे पूर्ण ४० गुंठे (एक एकर) क्षेत्रातील निर्यातक्षम बाग भुईसपाट झाल्या आहेत. बागांचे अ‍ॅँगल व तारा कुठल्याही प्रकारे उपयोगात येणार नाही. बाग संपूर्णपणे नाहीसी झाली आहे. द्राक्षबागेची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी दिनकर व वसंतराव देवकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)