शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

ढगाळ वातावरणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 19:02 IST

पिंपळगाव बसवंत : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ तर माण्यांना तडे जाण्याची दाट शक्‍यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे.

पिंपळगाव बसवंत : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ तर माण्यांना तडे जाण्याची दाट शक्‍यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. बुधवारी १२.४ गुरुवारी १६.८ तर शुक्रवारी २९.२ व कमीतकमी १८.० तापमान होते तर शनिवारी २८.२ व कमीकमी १७.४ बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षपिकाला बसण्याची शक्यता आहे.फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये द्राक्षकूज, मणीगळ होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर द्राक्षबागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आधीच यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे आणि त्यातच बदलत्या हवामानाचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.सध्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. मागीलवर्षी अति पावसामुळे आणि बागेत पाणी साचल्याने द्राक्षाचे घड जिरल्याची समस्या दिसून आली. त्यातून शेतकऱ्यांनी आपल्या बागा बचावल्या मात्र कोरोनाच्या महामारीत निर्यातक्षम द्राक्ष कवडीमोल विकावी लागली. आणि पुन्हा चालू वर्षी आस्मानी सुलतानी संकट उभे राहून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे.ढगाळ वातावरणामुळे द्राक्षकूज, मणीगळ ही समस्या दिसणार आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे त्यासही ड्रीप व स्प्रेने कॅल्शियम द्यावे.- सुनील गवळी, द्राक्ष शेती सल्लागार. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी