वनसगांव : द्राक्षाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कधी गारपीट तर कधी अवकाळी अशा अस्मानी सुल्तानी संकटांनी शेतकरी पुर्ण हवालदील होतांना दिसत आहे. यंदा द्राक्ष पिकाचे हंगाम सुरु होताच भाव गडगडले असल्याने तसेच थंडीचा जोरदार फटका बसल्याने व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी पुर्ण चिंतेत सापङला आहे.चांगल्या दर्जाची द्राक्षे अवघे ५० ते ६० रु पये तर लोकल द्राक्ष सुमारे २५ ते ३० रु पये किलोदराने विक्र ी होतांना दिसत असुन उत्पादन खर्च देखील फिटत नही. औषधाचा खर्च, मजूरी जाता मुबलक रक्कम हातात पडते, त्यामुळे निफाड परीसरातील शेतकरी चिंतेत आहे. बदलत्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागेवर डावनी या रोगाचा प्राद्रुभाव वाढल्यामुळे अशा परिस्थीतीत उत्पादनात लक्षणीय घट होतांना दिसत आहे.द्राक्षबागेची उभारणी आणि संगोपन अतीशय मेहनतीचे व खर्चीक काम आहे. निर्यातक्षम द्राक्षांच्या जपणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्ज काढावे लागते त्यामुळे भरपूर उत्पन्न मिळाले तर बँकेचे कर्ज देखिल वेळेवर फेडता येवू शकते. मात्र सद्या कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन शेतकरी आपली उपजीविका करत आहेत.नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते वर्षातुन एकदा घेतले जाणारे हे पीक शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट या द्राक्षपिकावर अवलंबून असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळाला तर शेतकरी सुखी जीवन जगु शकतो.यंदा थंडी मुळे द्राक्ष बागेवर मोठ्या प्रमाणात फरक जाणवला. द्राक्षांना तडे जाण्याचे प्रमाण वाढले परीणामी फुगवणीवर परीणाम झाला. सध्या बाहेरच्या राज्यात द्राक्षाला उठाव नसल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठ द्राक्षाला अद्याप विशेष मागणी नाही. त्याचमुळे भाव कमी मिळतोय आॅगस्ट अखेर व सप्टेंबर पुर्र्वी या द्राक्षबागेला थंङीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.द्राक्षबाग जगवुन मोठ्या प्रमाणात रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करुन द्राक्षबागेचा सांभाळ केला. मोठ्या प्रमाणात दर मिळेल अशी आशा पल्लवीत होतांना दिसते, मात्र द्राक्षबागेचा कोसळलेला दर बघुन आता चिंता वाटतेय.- चंद्रभान जाधव,द्राक्ष उत्पादक शेतकरी, निफाड.
द्राक्ष पंढरीतच द्राक्षांचे भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:07 IST
वनसगांव : द्राक्षाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कधी गारपीट तर कधी अवकाळी अशा अस्मानी सुल्तानी संकटांनी शेतकरी पुर्ण हवालदील होतांना दिसत आहे. यंदा द्राक्ष पिकाचे हंगाम सुरु होताच भाव गडगडले असल्याने तसेच थंडीचा जोरदार फटका बसल्याने व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी पुर्ण चिंतेत सापङला आहे.
द्राक्ष पंढरीतच द्राक्षांचे भाव कोसळले
ठळक मुद्देनिफाड : वाढलेल्या गारठ्यामुळे शेतकरी चिंतेत