शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनुदान उपलब्ध

By admin | Updated: March 6, 2017 01:28 IST

नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.

 नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. समाज कल्याण खात्याने यासंदर्भातील निर्णय घेतला असून, ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वसतिगृहात प्रवेश मिळू शकलेला नाही, असे विद्यार्थी यासाठी पात्र ठरतील.या योजनेसाठी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात सन २०१६-१७ पासून सामाजिक न्याय विभागाने सुरू केली आहे. या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातील (जात प्रमाणपत्र जेथून काढले आहे) सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात दि. १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त काशीनाथ गवळे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदविका या परीक्षांमध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून, या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा म्हणजे विद्यार्थी स्थानिक नसावा (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा) पात्र विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाहभत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी आपले बॅँक खाते आधार कार्डाशी लिंक करून घेणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व माहिती ँ३३स्र२://ेंँंी२ूँङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही, असेही सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)