शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

महापालिकेच्या हाती सप्टेंबरचेही अनुदान

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

तत्पर सरकार : एलबीटीपोटी ४५.८५ कोटी वितरित

नाशिक : एरव्ही सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या महापालिकेला एकापाठोपाठ एक सुखद धक्के मिळत असून, एलबीटीच्या मोबदल्यात आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर महिन्याचेही अनुदान हाती पडणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नाशिक महापालिकेला सप्टेंबर महिन्याचे ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार धरून महापालिकेला एकाच महिन्यात सरकारकडून सुमारे १०५ कोटी रुपयांचे दान मिळाल्याने प्रशासन सुखावले आहे. राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकांचे उत्पन्न घटणार असल्याने सदर तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचे घोषित केले आहे. सरकारने १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा करण्यापूर्वीच महापालिकांना सहायक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे २०९८ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून अनुदान वेळेत उपलब्ध होते किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्था असतानाच सरकारने ४ आॅगस्टलाच नाशिकसह राज्यातील २५ महापालिकांना आॅगस्ट महिन्याचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिकेला ४५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच अनुदान हाती पडल्याने महापालिकेला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर राज्य सरकारने १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची एप्रिल ते जून या कालावधीतील १३ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कमही नाशिक मनपाला वितरित करण्याचे आदेश काढल्याने मनपाला एक सुखद धक्का बसला.