शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गुणवत्ताप्राप्त शाळांनाच अनुदान

By admin | Updated: June 8, 2014 00:18 IST

येवला : राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्या यांचा ‘कायम’ शब्द अनुदान देण्याकामी मूल्यांकनाचे निकष शासनाने निश्चित केले

 

दत्ता महाले   येवलायेवला : राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्या यांचा ‘कायम’ शब्द फेब्रुवारी २०१४मध्ये काढल्यानंतर आता अनुदान देण्याकामी मूल्यांकनाचे निकष शासनाने निश्चित केले असून, विविध अंगाने शाळांची गुणवत्ता तपासून त्या कसोटीवर संबंधित शाळा उतरल्या तरच या विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.शासनाने परवानगी दिलेल्या, कमीत कमी चार वर्षांपासून सुरू असलेल्या व मूल्यांकनाच्या कसोटीवर उतरणाऱ्या शाळांना टप्प्यानुसार अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी २० टक्के, दुसऱ्या वर्षी ४० टक्के, तिसऱ्या वर्षी ६० टक्के, चौथ्या वर्षी ८० टक्के, पाचव्या वर्षी १०० टक्के अनुदान निधीच्या उपलब्धतेनुसार दिले जाणार आहे. यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आरक्षणाचे धोरण व निकष पाळणे, अनुदान मिळविण्यासाठी बंधनकारक आहे. सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी, विज्ञान शाखेसाठी १०० गुणांचा, तर कला व वाणिज्य शाखेसाठी ९४ गुणांचा मूल्यांकनाचा पेपर द्यावा लागणार आहे. यामध्ये मूल्यांकनाच्या निकषानुसार आदिवासी उपयोजन क्षेत्र व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील व शैक्षणिकदृष्ट्या मागास गटासाठी विज्ञान शाखेसाठी १०० पैकी ६५ व कला व वाणिज्य शाखेसाठी ९४ पैकी ६१ गुण घ्यावे लागतील. तर इतर गटांमध्ये विज्ञान शाखेसाठी १०० पैकी ७० व कला व वाणिज्य शाखेसाठी ९४ पैकी ६६ गुण घ्यावे लागतील. तरच संबंधित ज्युनिअर कॉलेज अनुदानाच्या टप्प्यावर येणार आहे. अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निकषांमध्ये संबंधित ज्यु. कॉलेज शैक्षणिक गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जाऊन, विविध गोष्टींसाठी असलेल्या ५० गुणांपैकी ३८ गुण मिळायलाच हवे तरच शाळा अनुदानास पात्र ठरणार आहे.शैक्षणिक गुणवत्तेच्या तपासणीबाबत उच्च माध्यमिकमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांसह मुख्याध्यापकांना गुणांची कमाई करण्यासाठी विद्यार्थी दररोज शाळेत यावा. यासह त्याने अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर तीच पटसंख्या बारावीमध्ये टिकवावी लागणार आहे. म्हणजेच विद्यार्थी गळती थांबवावी लागेल. अध्यापनात, संगणक, ओव्हरहेड प्रोजेक्टर यासह आधुनिक साहित्याचा वापर करून खेळीमेळीचे आनंददायी वातावरण निर्माण करावे लागेल. शालेय व्यवस्थापनात पारदर्शकता, बॅँकेद्वारे शिक्षकांचे वेतन देणे यासह कार्यालयीन कामकाजाचा लेखाजोखा अपटेड ठेवावा लागणार आहे, तरच ५० पैकी किमान ३८ गुणांची कमाई केल्यानंतर अनुदानप्राप्तीची पहिली खिडकी उघडणार आहे.शाळेची गुणवत्ता तपासणीबरोबरच विद्यार्थी केंद्र मानून त्याच्यासाठी शालेय प्रशासन उपलब्ध करून देत असलेल्या भौतिक सुविधांची तपासणी होऊन ५० गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यालयासाठी सुसज्ज इमारतीसह सुसज्ज क्लासरूमसह मुलांची सुरक्षितता याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. केवळ ग्रंथालय नको तर त्यात सुविधा आहेत. का? पुस्तके, संदर्भग्रंथ, बैठक व्यवस्था करावी लागेल. प्रसाधनगृहावरही विशेष लक्ष केंद्रित करून संख्येनुसार प्रसाधनगृह करावे लागेल. पाण्याची व्यवस्थेसह परिसरातील वातावरण चांगले राहण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी लागेल. या मूल्यांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील उच्च माध्यमिकला अनुदान पदरात पाडून घ्यायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मूल्यांकनाच्या निकषावर पास होण्यासाठी संबंधितांनी तयारीला लागणे गरजेचे आहे. विनाअनुदानित उच्च विद्यालयावर अल्पवेतनावर ज्ञानदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल व आपला प्रपंच होईल या आशेवर शिक्षक, शिक्षकेतर मंडळी वर्षानुवर्षे काम करीत आहे. शासनाने उशिरा का होईना पण सकारात्मक पाऊल उचलले आहे. परंतु याची कार्यवाही विशिष्ट कालमर्यादेत व्हावी, अशी अपेक्षा आहे.