शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत आजोबा-नातू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

डीजीपीनगर रायन इंटरनॅशनल शाळेसमोर राहणारे ॲड. मिलिंद भगवान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे वडील ...

डीजीपीनगर रायन इंटरनॅशनल शाळेसमोर राहणारे ॲड. मिलिंद भगवान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे वडील भगवान गायकवाड (६७) आणि भाचा अरीण (३) हे स्कुटी या दुचाकीने (एमएच १५ बीपी ८२९८) टागोरनगर येथील दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते. येथून घरी परतत असताना टागोरनगर येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिरासमोर एका आय टेन कारने (एमएच०२ बीवाय ४४१५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अरीण या बालकाच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच भगवान गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या कारचालकाने दुसऱ्या एका दुचाकीलाही (एमएच१५ सीए १४४२) धडक दिली. यामुळे या दुचाकीचा चालकही बालंबाल बचावला. तो किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दुचाकींना धडक देऊनही कार थांबली नाही तर रस्त्यालगतच्या एका दुकानासह संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातानंतर कारमधील तिघेजण मद्यधुंद अवस्थेत बाहेर आल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. अपघातात आजोबा व नातवाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कारचालक फिरोज नासीर खान (३६,रा. मोटवानी रोड नाशिकरोड) याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

---

===Photopath===

300621\30nsk_25_30062021_13.jpg~300621\30nsk_26_30062021_13.jpg

===Caption===

आजोबा भगवान, नातू अरीन~आजोबा भगवान, नातू अरीन