शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा २९ ला नाशकात महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:18 IST

इतर समाजाच्या तुलनेत मागे पडलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल.

ठळक मुद्देइतर समाजाच्या तुलनेत मागे पडलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल.

नाशिक : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्मातील जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी रविवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.उर्वरित १४ पोटजातींना इतर मागासवर्गीय दर्जा मिळावा, जंगम समाजातील माला, बेडा, बुडगा या जातींना मागासवर्गीय दाखले मिळावेत आदी विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. लिंगायत धर्माला मान्यता मिळाल्यास या वर्गातील समाजबांधवांना स्वतंत्र धर्मपीठाची मान्यता, लिंगायत अल्पसंख्याक शाळा, धार्मिक स्थळांचा विकास असे अनेक लाभ मिळवता येतील व इतर समाजाच्या तुलनेत मागे पडलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल, असे समितीतर्फे सांगण्यात आले. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी विभागातील हजारो लिंगायत समाजबांधव सहभागी होणार आहेत. नाशिकरोडच्या पासपोर्ट कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चाची समाप्ती होणार आहे. लिंगायत संघर्ष समितीने २०१४ पासून या मागण्यांसाठी ठिकठिकाणी मोर्चे, उपोषण आदी केले होते. तत्कालीन सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने समितीकडून तीव्र संघर्ष करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी काका कोयटे, अनिल चौघुले, चंदशेखर दंदणे, दुर्गेश भुसारे, अ‍ॅड. अरुण अवटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार