शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामोत्थान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 23:52 IST

पिंपळगाव बसवंत : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविण्याकामी ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात बैठक झाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

ठळक मुद्देमंत्रालयात बैठक : आमदार बनकर यांनी दिली माहिती

पिंपळगाव बसवंत : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविण्याकामी ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात बैठक झाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.ग्रामोत्थान योजना राबविण्याची मागणी आमदार बनकर यांनी केलेली होती. त्यानुसार दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग यांच्यासमवेत बैठक झाली होती.या बैठकीमध्ये राज्यातील २५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामोत्थान योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सदर प्रस्ताव हा इतिवृत्त निर्गमित झाल्यापासून १ ते २ महिन्यांच्या आत सादर करण्याबाबत सूचित केलेले होते. मात्र, तो प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित असल्याने त्या अनुषंगाने बनकर यांनी ग्रामविकास मंत्री यांना पुनश्च बैठक आयोजित करण्याबाबत दि.२६ मे २०२१ रोजी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.२३) ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात या संदर्भात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव मोहिते, उपसचिव गागरे, कार्यासन अधिकारी तेलवेकर, कार्यासन अधिकारी जाधवर यांच्यासह पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, राजेंद्र डोखळे आदी उपस्थित होते.प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशबैठकीमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत विभागात विकासकामे करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी व लागणारा विकास निधी याबाबत चर्चा झाली असून मोठ्या ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त निधी प्राप्त व्हावा याकरिता नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना सुरू व्हावी यासाठी तत्काळ त्या योजनेचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात यावा असे निर्देश मुश्रीफ यांनी संबंधित विभागास दिले आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत