शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणची शहर पोलिसांवर ६९ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक : पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ ...

नाशिक : पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.

पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. ८) शहरातील पोलीस कवायत मैदानावर ग्रामीण पोलीस विरुद्ध शहर पोलीस दलाच्या प्रेक्षणीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता पोलीस आयुक्त दीपक पांडे व पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला प्रारंभ झाला. ग्रामीण पोलीस दलाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने नियोजित १२ षटकांत विक्रमी १६१ धावांचा डोंगर उभा करून शहर पोलिसांसमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले. यात ग्रामीण पोलीस दलाचे उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी तडाखेबंद १०९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरारादाखल विजयासाठी १६२ धावांचे आव्हान समोर घेऊन मैदानात उतरलेल्या शहर पोलीस दलाचा संघ १२ षटकात अवघ्या ९२ धावाच करू शकला. यामुळे ग्रामीण दलाचा ६९ धावांनी विजय झाला. या सामन्यात शतक ठोकणाऱ्या स्वप्निल राजपूत यांना सामनावीर पुरस्काराने तर सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले - श्रींगी, अतिरिक्त अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

इन्फो-

क्रिकेटसह कोणताही मैदानी खेळ हा शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. खेळातून मानसिक आरोग्य सुधारण्यासाह सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. ज्याचा उपयोग प्रत्यक्ष कामगिरीत होतो. त्यामुळे प्रत्येकाने खेळले पाहिजे, शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी केले.

(आरफोटो-०८ पोलीस क्रिकेट)