शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

५१ सैनिकांच्या मातांचा ग्रामगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:56 IST

लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांना व सैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी (ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे गाव भगवेमय झाले होते.

लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांनासैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी(ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी येथील जिव्हाळा बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष आर.के. पवार होते. खुंटेवाडी हे सैनिकांचे गाव आहे.येथील ५१ पेक्षा जास्त युवक हे संरक्षण क्षेत्रात आहेत. या सैनिकांचा गावाला अभिमान असून, प्रत्येक राष्ट्रीय उत्सवाला सुटीवर आलेल्या सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. या सैनिकांना शिकवण व पाठबळ देणाऱ्या ५१ मातांचा सन्मान शिवजयंतीनिमित्त करण्यातआला. उपसरपंच भाऊसाहेब पगार व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश सावकार, कल्पना भामरे, जिभाऊ भामरे, पंडितराव पगार, बाळासाहेब भामरे, उद्धव भामरे, देवा भामरे, नानाजी सावकार, केवळराव भामरे, डॉ. निंबा भामरे, एन.एस. भामरे, पोलीसपाटील कल्पना भामरे, सेवानिवृत्त शिक्षक निंबाजी पगार, गंगाधर भामरे, भीमराव रौंदळ, भीमराव सावकार उपस्थित होते. प्रा. बापू रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक पी.के. सूर्यवंशी यांनी आभार मानले.गावातून वेशभूषा केलेल्या बालशिवराजे, जिजाऊ, सईबाई व मावळे यांची घोड्यावर बसवून लेझीम पथकाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. आयुष शशिकांत भामरे या बालव्याख्यात्याने भाषण केले. प्राजक्ता तायडे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. यावेळी गावातील प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे गाव भगवेमय झाले होते.