शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

‘ग्रामसभा आपल्या दारी’

By admin | Updated: October 13, 2015 22:52 IST

उपक्रमलासलगाव : महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न

लासलगाव : ग्रामसभा घेण्यासाठी शासनाने ठरविलेल्या दिवशी वेळेअभावी वा कामाअभावी प्रत्येकजण उपस्थित राहू शकत नाही. रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाव्या लागणाऱ्या महिलांची उपस्थिती त्यात नगण्य असते. त्यामुळे नवनिर्वाचित उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या संकल्पनेतून नागरिक आपल्याकडे येण्याऐवजी आपणच त्यांच्याकडे जाऊन अडचणी समजून घेऊ या उद्देशाने ग्रामपंचायतीने ‘ग्रामसभा आपल्या दारी’ हा उपक्रम गत आठवडाभर राबविला. यात सहा वॉर्डांतून कृषीनगर, श्रीरामनगर, सप्तशृंगीनगर, सुमतीनगर, गणेश मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, श्रीराम मंदिर, अहल्यादेवी चौक या ठिकाणी आठ ग्रामसभा सरपंच संगीता शेजवळ, उपसरपंच जयदत्त होळकर, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच कुसुमताई होळकर, स्नेहल ब्रह्मेचा, श्वेता मालपाणी, रोहिणी मोरे, गुलशन मन्सुरी, राणी शहा, सचिन होळकर, प्रतिभा पानगव्हाणे, योगीता झांबरे, योगेश पाटील, संतोष पलोड ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंडे यांच्यासह सुवर्णा जगताप, संतोष ब्रह्मेचा, प्रकाश पाटील, राजेंद्र चाफेकर, गोकुळ पाटील, विजय जोशी, ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंढे, डॉ. विकास चांदर, डॉ. श्रीनिवास दायमा, रवि होळकर, बाळासाहेब बोरसे, चंद्रभान मोरे व त्या-त्या वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.नागरिकांनी मांडलेल्या सूचना व समस्यांचे लेखी प्रोसेडिंगही यावेळी करण्यात आले. सहाही ग्रामसभेतून प्रत्येक वॉर्डात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी वेळेवर सोडणे या समस्या प्रामुख्याने उपस्थितांनी मांडल्या. तसेच एकवेळ रस्त्याची कामे उशिरा करा मात्र गावात भुयारी गटारीच्या कामास प्राधान्य द्यावे, कारण सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे मत जाणकार नागरिकांनी मांडले. ग्रामसभेतून समोर आलेल्या सूचना व समस्यांची विगतवारी केली जाईल. ज्या समस्या ग्रामपंचायत पातळीवरील आहेत त्या तातडीने सोडविल्या जातील. नागरिकांच्या मुख्य समस्यांमध्ये रस्ते, सांडपाणी व पावसाचे पाणी यासाठी भुयारी गटार आदिंवर पुढील पाच वर्षांसाठी अंदाजे किती खर्च होणार आहे याचा आराखडा तयार केला जाईल. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी संभावित कामांसाठी शासनाच्या योजना मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंडळ प्रयत्न करेल व जसजसा निधी उपलब्ध होईल तसतशी प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही उपसरपंच होळकर यांनी दिली. (वार्ताहर)