लहवित गावात आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. लहवित ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलला सात जागा तर एक अपक्ष सह ग्रामविकास पॅनलच्या सात जागा निवडून आलेल्या आहेत. संपत लोहकरे, सत्यभामा लोहकरे या दोघांपैकी एकाची निवड होऊ शकते. सत्यभामा लोहकरे हे तर विजयी असूनही चुकून पराभूत असल्याचे वाटले होते, पण त्याच्या विजयामुळे ते सरपंचपदी विराजमान होऊ शकतात. वंजारवाडी ग्रामपंचायतीत आपला पॅनलची युवा नेतृत्व सत्तेवर आले असून सर्वसाधारण प्रवर्गामुळे सेवानिवृत्त लष्करी जवान ज्ञानेश्वर शिंदे यांची निवड होऊ शकते. लोहशिंगवे ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंचपदाची निवड होणार असून श्री शेतकरी विकास पॅनलचे स्पष्ट बहुमत असून रघुनाथ जुंद्रे, युवराज जुंद्रे तर महिला गटातून योगिता जुंद्रे यापैकी एकाची निवड होऊ शकते. नानेगाव ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलला सहा जागा मिळून बहुमत असून अशोक आडके किंवा काळू आडके यापैकी एकाची सरपंचपदी निवड होऊ शकते. दोनवाडे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक ठुबे यांची एकतीस वर्षांपासून सत्ता असून शैला अशोक ठुबे गेल्या दहा वर्षांपासून सरपंच आहेत. दोनवाडे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत सर्वसाधारण निघाल्याने तिसऱ्यांदा शैला ठुबे यांचीच निवड होण्याची शक्यता आहे. शेवगेदारणा ग्रामपंचायतीत सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले असून दीपक कासार यांच्या पॅनलमधून पुष्पा कासार तर राष्ट्रवादीच्या पॅनलकडून अशोक पाळदे हे दोन उमेदवार ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहे. बेलतगव्हाण ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून मोनीष दोंदे एकमेव उमेदवार असून दोंदे यांचीच सरपंचपदी निवड होणार आहे. संसरी येथे २०२४ पर्यंत लोकनियुक्त सरपंच असून त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे. राहुरी येथेही कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सर्वसाधारण गटासाठी राखीव राहणार आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी महिला, पुरूष सोडत बाकी असल्याने त्या सोडती नंतरच सरपंचपदाचे नाव अंतिम होणार आहे.
ग्रामपंचायतींना लागले सरपंचपदाचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST