शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प

By admin | Updated: May 27, 2017 23:54 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे. ग्रामसेवक शिक्षक आदींसह अनेकांचे पेमेंट मिळत नाही. ग्रामपंचायतीसंबंधी पेमेंट थांबल्याने कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी अनेक जीवनावश्यक व आरोग्याशी निगडित कामांवर परिणाम झाला आहे. या संबंधात त्र्यंबकेश्वर तालुका बँकेच्या विभागीय कार्यालयास भेट दिली व बँकेची आर्थिक स्थिती खालावण्याचे कारण काय? असे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वारे वाहत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे कर्जमाफी मिळेल या आशेवर कर्ज कोणी भरण्यासाठी तयार नाही. आज त्र्यंबक तालुक्यात बँकेची सभासद संख्या ६५०० आहे. आणि या सर्वांनी कर्ज उचललेले आहे. यात ४५०० सभासद थकबाकीत गेले आहेत. बँकेची थकबाकी ६४ कोटी असून, वसुली फक्त ४ टक्के म्हणजे ४ कोटी तर व्याज ३ कोटी असे ७ कोटीच फक्त वसूल आहेत. आज ५० कोटी थकीत रक्कम असल्याने बँकेच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. बँकेत कोणताच भरणा होत नाही. वीजबिले बंद झाली आहेत. थकबाकीदारांची संख्या अजून वाढणार असून मध्यम कर्ज व अल्प मुदतीची वसुली आता सुरू होणार आहे. ७५ टक्के कर्जामध्ये द्राक्ष, ऊस आदी बागायती शेतीसाठी कर्ज दिलेले आहे. त्यामुळे या कर्जाचीदेखील थकबाकी वाढणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल असल्याने ग्रामीण भागात विखुरला आहे. आता खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे. ग्रामीण आदिवासी शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्यांशिवाय आधार नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे कर्जमाफीची आशा तर दुसरीकडे या आशेमुळे घेतलेले कर्ज भरले गेले नाही, वसुली होत नाही. त्यातल्या त्यात बँकेच्या जुन्या नोटा सुमारे ३५० कोटी, ज्या बदलून मिळाल्या नसल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. आज त्र्यंबकेश्वर बँकेत कोणी कर्मचारी जागेवर दिसला नाही. एखादा दिसला असेल तर तो म्हणाला व्यवहाराच नाही तर बसून काय करणार ? सध्या बँकेने महसूल विभागामार्फत तलाठ्यांकडून थकबाकीदारांच्या सात बारा उताऱ्यावर बँकेचे नाव मोबदला करण्यास सुरु वात झाली आहे.